‘चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर केली नाही ना?, कोथरुडमधील जनतेला प्रश्न पडला असावा’

by Team Deccan Express
ncp clyde crasto slams bjp chandrakant patil over ajit pawar and thackeray government statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील ठाकरे सरकार पडणार नाही असे अजित पवारांना सारखं का सांगावं लागत आहे असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी उपस्थित केला होता. जर सरकार पडणार नाही असा विश्वास असेल तर मग इतकं आकांडतांडव कशासाठी करता ? आम्ही राज्यात सत्ताबदल होईल याची आस लावून बसलो नाही. मात्र, राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहित आहे. सध्या ते खोटे पणाचा आव आणत आहेत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी अजित पवारांचा समाचार घेतला. यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना थेट इशारा, म्हणाले – ‘मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा…’

‘चंद्रकांतदादांना chandrakant patil मत देऊन चूक तर केली नाही ना? कोथरुडमधील जनतेला प्रश्न पडला असावा’ अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे. क्लाईट क्रास्टो यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. चंद्रकांत पाटीलजी, जेवढा वेळ संभ्रम निर्माण करण्यात लावताय, तेवढा वेळ मतदारसंघातील लोकांना दिला असतात तर… तुमच्या मतदारांना मदत झाली असती. आता त्यांच्या मनात प्रश्न पडणार, आम्ही चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर नाही केली ना ? असं क्रिस्टो यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

भगीरथ भालके यांच्यासाठी अजित पवार पंढरपुरात जोरदार प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान अजित पवार भाजपवर निशाणा साधत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणारा जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही, अशा शब्दात अजित पवारांनी भाजपवर हल्ला चढवला होता. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर-मंगळवेढ्यात येऊन गल्लोगल्लीत फिरावं लागत आहे. राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागत आहे. हा त्यांचा स्वभाव नाही तो शरद पवार यांचा स्वभाव आहे, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला. मला चंपा म्हणणं बंद करा. अन्यथा मग मी देखील पार्थ पवार आणि इतरांचे शॉर्टफॉर्म सांगेल, असा इशारा चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी दिला.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts

Leave a Comment