IMPIMP

अखेर राष्ट्रवादीचं ठरलं ! गृहमंत्री देशमुखांबद्दल घेतला निर्णय, एप्रिलमध्ये होणार महाविकास आघाडीत खांदेपालट?

by bali123
ncp finally takes a decision about anil deshmukh resign changes in goverment in april

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे अनिल देशमुख हे अडचणीत सापडले आहेत. भाजपने अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादीच्या ncp अनेक नेत्यांनी देशमुख यांची पाठराखण केली. अखेर राष्ट्रवादी ncp काँग्रेसने अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल देशमुख यांच्या खात्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात अल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. एप्रिल महिन्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, राष्ट्रवादी ncp काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत देशमुख यांची पाठराखण केली. पण अखेर राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून एप्रिल महिन्यात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपद जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, पोलिस दलातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावरच गंभीर आरोप केल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि अनिल देशमुख यांची दिल्लीत एक बैठक पार पडली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत देशमुख यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. याशिवाय पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत त्यांनी गृहमंत्र्यांकडून माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

सचिन वाझे प्रकरणात शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीकडून गृहमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. यासाठी शरद पवार पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts