IMPIMP

मंत्री हसन मुश्रीफ यांचा भाजपला अल्टीमेटम, म्हणाले – ‘2 दिवसात माफी मागा अन्यथा…’

by bali123
ncp leader hasan mushrif press conference at kolhapur statement on parambir singh and devendra fadanvis

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना पोटात दुखत असल्यानं अलीकडेच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावरून दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल ( Naveen Kumar Jindal ) यांनी मात्र या आजारपणावरून पवारांवर टीका केली होती. सचिन वाझेनं एनआयए समोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं ? असा सवाल त्यांनी केला होता. आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते तसंच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी यावर भाष्य करत भाजपनं माफी मागावी अन्यथा चोख उत्तर मिळेल असा इशारा दिला आहे.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हसन मुश्रीफ hasan mushrif यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. इतकंच नाही तर त्यांनी नवीन कुमार जिंदल यांच्या वक्तव्याच्या समाचार घेत निषेध केला आहे. भाजपनं या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘महाराष्ट्रातील लोकही भारतीयच हे विसरू नका’; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

‘शरद पवारांवर अशा शब्दात टीका करायला जिंदलला लाज नाही का वाटली ? दोन दिवसात माफी मागा, अन्यथा…’
हसन मुश्रीफ hasan mushrif म्हणाले, भाजपनं या प्रकरणी लवकरात लवकर माफी मागावी, अन्यथा आमच्याकडूनही अशा प्रकारची वक्तव्य केली जातील. मग कुणाच्या पाठीतून आणि कुणाच्या डोक्यातून कळा येतात हे समजेल. शरद पवारांवर अशा शब्दात टीका करायला जिंदलला लाज नाही का वाटली ? असं म्हणत मुश्रीफ यांनी सडकून टीका केली. दोन दिवसात माफी मागा, अन्यथा राष्ट्रवादी जशात तसं उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

काय म्हणाले होते नवीन कुमार जिंदल ?
नवीन कुमार जिंदल यांनी पवारांच्या पोटदुखीच्या त्रासाचा संबंध सचिन वाझे प्रकरणा (Sachin Vaze) सोबत जोडला होता. एनआयएनं अटक केल्यापासून सचिन वाझे रोज काही ना काही नवीन खुलासे करत आहेत. यावरून भाष्य करत नवीन कुमार जिंदल यांनी पवारांवर निशाणा साधला होता.

‘वाझेनं एनआयए समोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं ?’
सोमवारी (दि 29 मार्च 2021) काही ट्विट करत नवीन कुमार जिंदल म्हणाले होते की, सचिन वाझेनं एनआयए समोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं ? आता तर असं वाटतंय की, दाल में कुछ काला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है असं ते म्हणाले होते.

इतकंच नाही तर आपल्या आणखी एका ट्विटमध्ये, शरद पवारांच्या पोटदुखीमुळं पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं वाटतंय अशी खोचक टीकाही नवीन कुमार जिंदल यांनी केली होती.

Also Read:

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts