IMPIMP

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

by bali123
ncp leader praful patel clarified that union minister amit shah and sharad pawar did not meet in ahmedabad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदाबादमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले होते. हे वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार अशी चर्चा सुरु झाली. त्यातच अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सर्व भेटी सार्वजनिक केल्या जात नसल्याचे वक्तव्य केल्याने या दोन नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांना उधाण आले. या दोन नेत्यांच्या बैठकीच्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल praful patel हे देखील उपस्थित असल्याचे सांगितले जात होते.

‘WHO ने देशाच्या सीमा बंद करायला सांगितल्या तेव्हा PM मोदी ट्रम्पला आणून नाचवत होते’ (Video)

शरद पवार-अमित शहा यांच्या बैठकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना प्रफुल्ल पटेल praful patel यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार या चर्चा चुकीच्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा पाया शरद पवार यांनी रचना आहे. त्यामुळे अशा चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे पटेल यांनी सांगितले.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

दरम्यान, शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अमित शहांना याविषयी विचारले. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा यांनी सर्व भेटी सार्वजनिक करायच्या नसल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे ही बैठक झाल्याचे बोलले जात होते. मात्र, या दोन नेत्यांमध्ये अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले.

भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ’11 जणांचा जीव गेला तरी ‘सनराईज’वर शिवसेनेचे प्रेम कायम’

अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही – नवाब मलिक
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल praful patel यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झाली नसल्याचे मलिक यांनी सांगितले. भाजपवर हल्लाबोल करताना मलिक म्हणाले, भाजप बैठकीबद्दल अफवा पसरवत आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल जयपूर येथून थेट मुंबईत परतले होते.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts