IMPIMP

Pune : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या ‘बर्थ डे’ला पुण्यात ‘तमाशा’, अजित पवारांचा आदेश धुडकावला

by pranjalishirish
ncp leader rejects deputy chief minister ajit pawars order culture programme was organized pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन-  पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याची मागणी प्रशासनाने केली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  यांनी लॉकडाऊनला विरोध करत शहरात कडक निर्बंध लागू करण्याच्या सूचना आढवा बैठकीत दिल्या. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपले कार्यक्रम रद्द केले पाहिजेत असे आदेश दिले होते.

शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते? जयंत पाटलांनी सांगितलं, म्हणाले…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुण्यात घेतला होता. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  यांनी हा निर्णय जाहीर केला होता. असे असताना राजरोसपणे बालगंधर्व रंगमंदिरात एक लावणीचा कार्यक्रम रंगला होता. एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसे कसबा अध्यक्ष गणेश भोकरे यांनी केला आहे.

‘सह्याद्री’ तील दुर्मिळ वनस्पतीला दिले गेले शरद पवारांचे नाव !

पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राजकारण्यांनी कोणतेही कार्यक्रम घेऊ नये तसेच कोणत्याही कार्यक्रमला उपस्थित राहू नये असे आदेश अजित पवार यांनी दिले होते. असे असताना बालगंधर्व रंगमंदिरात थेट तमाशा रंगला, या कार्यक्रमाला कमी लोकांची उपस्थिती असली तरी अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेतेच अजित पवार  Ajit Pawar यांचे आदेश पाळत नसल्याने नेत्यांसाठी वेगळा कायदा आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Nana Patole : ‘नजरचुकीनं केलेली व्याजदर कपातीची चूक सुधारली, पण इंधन दरवाढीची घोडचूक कधी सुधारणार?’

बालगंधर्व रंगमंदिरात लावणी कार्यक्रम सुरु असल्याची माहिती मनसे नेत्यांना मिळाली. मनसेचे नेते त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी हा कार्यक्रम बंद पाडला. कोरोना वाढत असताना असा कार्यक्रम घेतला जातोय. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा वाढदिवस येथे साजरा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आदेश त्यांनी धुडकावला आहे, असा आरोप करत गणेश भोकरे यांनी संबंधित नेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

Related Posts