IMPIMP

महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

by Team Deccan Express
ncp leader rohit pawar slam bjp over coronavirus pandemic

नगर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. राज्यात रुग्ण वाढत असल्याने आणि सरकारने लागू केलेल्या नव्या निर्बंधावरुन विरोधकांनी राज्य सरकावर टीका केली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि त्यावरुन राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून विरोधकांना उत्तर देत सुनावलं आहे.

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले रोहित पवार ?
केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, तेलंगणा, बिहार, हरयाणा, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्येही कोरोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येत आहे. या राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील कोरोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथे कोरोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो. यावरुन राजकारण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Pawar  यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

रोहित Rohit Pawar पवारांनी पुढे म्हटले, भाजपचे नेते महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशा प्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत. ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय. मात्र हे संकट रोखण्यासाठी जे कारण गरजेचं आहे ते सर्व राज्य सरकार करतंय हेही तेवढंच खरंय. राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली.

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

इतर राज्यांची तुलना करताना रोहित पवार म्हटले, इतर राज्यांची आकडेवारी महाराष्ट्राइतकी नसली तरी त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या व शहरीकरणाच्या तुलनेत ती निश्चितच चिंतजनक आहे. ज्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखे शहरीकरण अधिक आहे. तिथं रुग्णांची संख्याही अधिक असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रातही एकूण रुग्णांच्या जवळपास 50 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर अशा मोठ्या शहरांमध्येच आहेत.

जर गुजरातचं उदाहरण द्याचं म्हटलं तर तिथंही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरत, अहमदाबाद, जामनगरमध्ये बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांवर हॉस्पिटलच्या आवारात, फरशीवर, खुर्चीवर बसून उपचार चालू असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी 8-8 तास थांबावं लागत असल्याचे विदारक चित्र पाहताना मन हेलावून जातं. रुग्णवाहिका नसल्याने कोणी चार चाकीतून मृतदेह नेत आहेत तर कोणी हात गाड्यावरुन नेत आहेत. हे आज गुजरातचं भीषण वास्तव आहे, असे रोहित पवार Rohit Pawar यांनी म्हटलं आहे.

ही वेळ एकमेकांची उणी-धुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतोय. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसान अधिक होणार आहे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

Read More : 

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts