IMPIMP

NCP | आधी व्यवस्थेची माहिती करुन घ्या, पटोलेंच्या पाळत ठेवण्याच्या विधानावर राष्ट्रवादी संतापली (व्हिडिओ)

by bali123
Nana Patole On Ajit Pawar | NCP leader ajit pawar responsible for eknath shindes mutiny big allegation of congress nana patole

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) NCP | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( DCM Ajit Pawar) हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप (Allegations) काँग्रेसचे प्रवक्ते नाना पटोले (Nana Patole) यांनी केले होते. नाना पटोले यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पटोले यांनी योग्य माहिती अभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करुन घ्यावी, असा टोला नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. NCP | ncp leader nawab malik refutes spying allegations made by nana patole

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हणाले होते नाना पटोले ?

लोणावळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला होता. तसेच आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आयबीचा रिपोर्ट रोज सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे जातो. बैठका, आंदोलन कुठे सुरु आहेत, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचा देखील रिपोर्ट गेला असेल. रात्री तीन वजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहित नसेल परंतु त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे सर्व व्यवस्था आहे, असे पटोले म्हणाले होते.

पटोलेंचे माहितीअभावी हे आरोप

नाना पटोले यांच्या आरोपावर भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक म्हणाले, पटोले यांनी माहितीअभावी हे आरोप केले आहेत. राज्यात सरकार कोणाचेही असो, राजकीय पक्षांच्या सभा, मोठ्या नेत्यांचे दौरे, मंत्र्यांचे दौरे याची माहिती पोलिस यंत्रणेला ठेवावी लागते. त्यासाठी असलेली विशेष शाखा (Special Branch) याबाबत गृहखात्याला माहिती देत असते. ही माहिती कोणत्याही पक्षाशी संबंधित असू शकते.

पटोलेंनी माहिती घेतली पाहिजे

पटोले यांना हे माहीत नसेल तर त्यांच्या पक्षात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून त्यांनी ही माहिती घेतली पाहिजे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. पटोले यांच्या कार्यक्रमाला, त्यांच्या नेत्यांना, काँग्रेसच्या मंत्र्यांना पोलीस सुरक्षा नको असेल तर त्यांनी तसं सांगावं. त्यासंदर्भात गृहखातं निर्णय घेऊ शकतं, असेही नवाब मलिक म्हणाले.

Web Title : NCP | ncp leader nawab malik refutes spying allegations made by nana patole

Related Posts