IMPIMP

NCP Raj Rajapurkar | मंदीरे उघडली, अन् भाजपचा ढोंगी चेहरा चव्हाट्यावर आला

by nagesh
NCP Raj Rajapurkar | The temples were opened and the hypocritical face of BJP came to the fore - NCP Raj Rajapurkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP Raj Rajapurkar | ‘कोरोना’ आपत्तीनंतर महाराष्ट्र सावरू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘महाविकास आघाडी सरकार’ने (maha vikas aghadi) आजपासून मंदिरे जनतेसाठी खुली केली. मंदिरे खुली होत असताना भाजपचा ढोंगी चेहरा मात्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर (NCP Raj Rajapurkar) यांनी केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मंदिरे उघडल्यानंतर सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही सिद्धीविनायकाचे सहकुटुंब दर्शन घेतले. छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी नाशिक सप्तश्रृंगी गडावर (Nashik Saptashrungi) जाऊन दर्शन घेतले. धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी परळी वैद्यनाथ (parali vaijnath) येथे दर्शन घेतले. आदिती तटकरे (aditi tatkare) यांनी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) व दत्ता भरणे (dattatray bharane) यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गपणती मंदिरात (shrimant dagdusheth ganpati) जाऊन दर्शन घेतले.

‘महाविकास आघाडी’चे नेते सकाळपासूनच मंदिरांमध्ये जावून दर्शन घेत होते. अजित पवार तर पहाटे सहा वाजताच मंदिरांमध्ये पोहोचले होते. परंतु भाजपच्या एकाही नेत्याला मंदिरात जायला वेळ मिळाला नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आशिष शेलार (ashish shelar), चित्रा वाघ (Chitra Wagh)असा कोणताच नेता सकाळी मंदिरात गेलेला दिसला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते आचार्य तुषार भोसले टाहो फोडत होते. गेल्या काही महिन्यांत लोकांची माथी भडकवून हे नेते मंदिरे खुली करण्याची मागणी करीत होते.

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मंदीरे खुली झाली. पण या नेत्यांना मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे सुचले नाही. लोकांमधून या नेत्यांच्या ढोंगीपणाबद्दल टीका सुरू झाली. त्यानंतर दुपारनंतर काही भाजप नेत्यांनी मंदिरात जाण्याचे सोपस्कार पार पाडले.

मंदिरात दर्शनासाठी जाण्याची वेळ सकाळची असते. लोकं सकाळी मंदिरात जाऊन दिवसाची सुरूवात करतात.
पण जनतेने शाब्दीक मार दिल्यानंतर भाजपचे नेते मात्र दुपारी मंदिरात गेल्याकडे राजापूरकर (NCP Raj Rajapurkar) यांनी लक्ष वेधले आहे.

देव व धर्म हा जनतेच्या आस्थेचा विषय आहे. पण भाजपने तो विषय राजकारणाचा बनवून टाकला आहे.
‘कोरोना’ काळात जनता संकटात असताना भाजप नेते मंदिरे उघडी करण्याची मागणी करीत होते.
लोकं मेली तरी चालतील, पण आपले राजकारण टिकले पाहीजे हाच भाजप नेत्यांचा घाणेरडा हेतू होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मंदिरे उघडल्यानंतर भाजप नेत्यांना देवाची मंदिरे दिसली नाहीत.
कारण त्यातून राजकीय फायदा नसल्याने या नेत्यांना मंदिरात जावेसे वाटले नाही.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाजपचा हा ढोंगी चेहरा महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळाला.
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे भाजपचा हा ढोंगी चेहरा जनतेच्या समोर आला आहे. (NCP Raj Rajapurkar)

Web Title :- NCP Raj Rajapurkar | The temples were opened and the hypocritical face of BJP came to the fore – NCP Raj Rajapurkar

हे देखील वाचा :

Pune News | ‘ती’ची करून कहाणी ! पुण्यात वणवण फिरून काम न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न; पोलिस अन् अग्नीशमनच्या जवानांनी वाचवलं

Ajit Pawar | ‘माझ्याशी रक्ताचं नातं म्हणून माझ्या 3 बहिणींच्या घरावर छापे टाकले याचं वाईट वाटतं’ – अजित पवार

PAN Aadhaar Linking | सर्व PAN, Aadhaar कार्डधारकांसाठी आवश्यक ! तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान

Related Posts