IMPIMP

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

by pranjalishirish
ncp rupali chakankar alleged ex cp parambir singh that he is the most corrupt officer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे चर्चेचत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर  Rupali Chakankar यांनी हल्लाबोल केला आहे. नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधी पक्षाची चाकरी करायची, आमाप संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करुन जायचं. असं कसं चालेल ? अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

रुपाली चाकणकर Rupali Chakankar  यांनी ट्विट करुन परमबीर सिंह यांच्यावर टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी #ParambirExposed या हॅशटॅगखाली परमबीर सिंह यांच्या संपत्तीचा लेखाजोगा मांडला आहे. परमबीर सिंह यांचे मुंबईमध्ये दोन कोटी रुपये किमतीचे दोन फ्लॅट आहेत. तर हरियाणामध्ये त्यांच्या गावी चार कोटी रुपये किमतीचे घर असल्याचे चाकणकर यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावे मुंबईमध्ये आणि हरियाणात कोट्यावधी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

परमबीर सिंह यांनी अंधेरीतली वसुंधरा सोसायटीत 2003 मध्ये 48.75 लाख रुपयांचा एक फ्लॅट घेतला आहे. तर 2007 मध्ये नेरळमधील शगुफा सोसायटीमध्ये 3.60 कोटी रुपये किमतीचा एक फ्लॅट घेतला आहे. याशिवाय 2019 मध्ये त्यांनी 14 लाख रुपये किमतीची जमीन खरेदी केली आहे. तसेच त्यांच्या हरियाणातील घराची किंमत चार कोटी रुपये असल्याची माहिती रुपाली चाकणकर Rupali Chakankar  यांनी दिली आहे.

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आयुक्तपदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी वसुल करण्याच टार्गेट दिले होते. असा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली असून विरोधी पक्षाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे.

Also Read : 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

Related Posts