IMPIMP

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

by Team Deccan Express
Amruta Fadnavis Bribery Case | 'Devendra Fadnavis himself Home Minister, investigate and bring the truth before the public' - Nana Patole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा करताना राज्यातील विविध घटकांसाठी पॅकेजची घोषणा केली. सरकारच्या पॅकेजवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. सरकारने जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole यांनी फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन नाही हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांचे वजन असेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्रात अडकलेले 90 हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत आणि या मुद्यावरुन राजकारण करु नये, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना सुनावलं.

काय म्हणाले फडणवीस ?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कडक निर्बंध लावणार असाल तर विविध घटकांना मदत केली पाहिजे. मात्र, सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज निव्वळ धुळफेक आहे. कारण 3 हजार 300 कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली आहे. ती नियमित बजेटमधील तरतूद आहे जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे सध्या वाढणाऱ्या कोरोनासाठी ही तरतूद नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

महाराष्ट्राचे 90 हजार कोटी मिळवून द्यावेत
नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेताना म्हटले की, कोरोनाच्या संकटात सर्वच जण आहेत. अशा वेळी राजकारण करण्यापेक्षा दिल्लीत तुमचं वजन असेल तर दिल्लीतून महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटी आणि इतर अनेक गोष्टींचे अडकलेले 90 हजार कोटी रुपये मिळवून द्यावे. यांचे दिल्लीत काही वजन नाही, कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. आम्हाल वेगळा निधी नको आहे. आम्हाल केवळ आमचे पैसे द्यावेत. तर सरकार सर्वांना मदत करेल. राज्य सरकारकडून ते करुन घ्यायची जबाबदारी काँग्रसेची असेल. परंतु यामध्ये राजकारण करु नका.

काही घटक सुटले आहेत
नाना पटोले nana patole पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं आम्ही समर्थन करतो तसेच पॅकेजसाठी अभिनंदन करतो. मात्र, यामध्ये काही घटक सुटलेले आहे. यामध्ये न्हावी, फुलं विक्रते, शेतकरी यांचा समावेश आहे. यासाठी काँग्रेस मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घटकांना मदत करण्याची मागणी करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

पंतप्रधानांना निवडणुकांचं पडले आहे
यावेळी बोलताना नाना पटोले nana patole यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. नाना पटोले म्हणाले, सध्या राजकारणापलिकडे जाऊन लोकांचा जीव वाचवणे हे सगळ्यांचे कर्तव्य असले पाहिजे. देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. आणि देशाचे पंतप्रधान काय करत आहेत ? त्यांना निवडणुकांचं पडलं आहे, अशी टीका पटोले यांनी केली. पंतप्रधानांवर निशाणा साधताना पटोले म्हणाले, विनामास्क प्रचार करुन ते काय संदेश देत आहेत ? एकीकडे मास्क घाला असे सांगितले जात असताना स्वत: पंतप्रधान विनामास्क प्रचारात मस्त आहेत आणि जनता कोरोनाने त्रस्त आहे. कोरोनामुळे लोकांचे प्राण जात आहेत. ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. अनेक कुटुंबातील कर्ते लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचे कोणी राजकारण करु नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

Read More : 

महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्‍या पायाचे, बलात्कारी’

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts