IMPIMP

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून नितेश राणेंची टीका, म्हणाले – ‘शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची वेळ आलीय’

by bali123
nitesh-rane-uddhav-thackaray

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. अनेक प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी विरोधकांना टोलेही लगावले. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सीएम ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण ऐकू शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची वेळ आली आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. ट्विट करत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

‘आता शिवसेनेची अधिकृतपणे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची वेळ आलीय’

आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे (nitesh rane) म्हणाले, काल  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुखांचं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की, आता शिवसेनेची अधिकृतपणे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची वेळ आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या भाषणबाजीवर काल बोलताना नटसम्राट नाटकाची आठवण झाली असं म्हणत खोचक टोला लगावला होता. आता मुख्यमंत्र्यांच्या नटसम्राटला नितेश राणे यांनी कॉमेडी सम्राट म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

‘कुणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री’

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले, आज एक कॉमेडी सम्राट विधानसभेत पाहिला आणि ऐकला. मुख्यमंत्र्यांचं भाषण राज्यपालांच्या अभिभाषणावर झालंच नाही. कुणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री अशी टीका राणेंनी केली आहे.

काय म्हणाले होते CM ठाकरे ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याच भास झाला.
मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथेल्लो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला.
सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेग.
पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही जाणवलं अशी बोचरी टीका त्यांनी केली.

औरंगाबादमध्ये खळबळ ! ‘कोरोना’ सेंटरमध्ये डॉक्टरचा पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न

Related Posts