IMPIMP

Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

by nagesh
Nitesh Rane | nitesh rane critisized sanjay raut on ganja

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nitesh Rane | महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक आरोप-प्रत्यारोपाचे प्रकार पाहावयास मिळत आहे. यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. नुकतंच दसरा मेळाव्यात शिवसेनेने भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपनेही शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) सामनाच्या अग्रलेखातुन भाजपवर निशाणा साधला. ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये वागत आहे त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शिवसेनेने केली. यानंतर भाजपचे आमदार नितेश (Nitesh Rane) राणेंनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नितेश राणे म्हणाले की, ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते.
गांज्यावर इतके प्रेम बर नाही. अशी जोरदार टीका नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही टीका ट्वीटच्या माध्यमातुन केली आहे.

दरम्यान, शिवसेनेनं त्यांच्या सामनातुन म्हटलं आहे की, भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते. अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.

Web Title: Nitesh Rane | nitesh rane critisized sanjay raut on ganja

हे देखील वाचा :

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

MP Supriya Sule | ‘ED, पाऊस राष्ट्रवादीसाठी ‘लकी’च’

Shivsena Vs Devendra Fadnavis | भाजपकडून पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर; शिवसेनेची सामनातून टीका

Yuvraj Singh | वादग्रस्त चॅटमुळे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग ‘गोत्यात’

Related Posts