IMPIMP

Nitin Gadkari | …म्हणून त्यावेळी पुणेकरांनी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका केली (व्हिडीओ)

by nagesh
Nitin Gadkari | … so at that time Punekar criticized me and Fadnavis (video) – Nitin Gadkari

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन आज पुण्यात (Pune) उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. त्यावेळी नितिन गडकरी (Nitin Gadkari) हे अनेक विषयावर बोलत होते. आधीपासून पुण्याशी माझा जवळचा संबंध आहे. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विशेषतः पुण्याकडे, नागपूरकडे माझं लक्ष आहे. मी दोन्ही जिल्ह्यांना मदत करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पुणे मेट्रोचं (Pune Metro) काम सुरू झालं नाही. नागपूरच्या मेट्रोचं (Nagpur Metro) काम पुढं गेलं. त्यावेळी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका झाली. असं त्यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यातील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमादरम्यान नितिन गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते. त्यावेळी पुण्यात मेट्रो (Pune Metro) भुयारी करायची, की वरून सुरू करायची यावर वाद होते. आग्रहाने निर्णय घेतला आणि मेट्रोच्या कामाची सुरुवात झाली. याचा मला आनंद असल्याचं गडकरी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, एक कोटी रुपये मेट्रोची किंमत आहे. पुणे-कोल्हापूर, सोलापूर, बारामती, लोणावळा येथे ब्रॉड गेज मेट्रो चालणार आहे. 2 बिझनेस क्लास विमानासारखे आहेत. विमानात हवाई सुंदरी असतात, तसेच येथेही असेल. त्याचं तिकीट एसटीच्या तिकीटीसारखं असणार आहे. 140 किलोमीटर याचा वेग आहे. त्यामुळे चंद्रकांत दादांना साडेतीन तासांत कोल्हापूरला जाता येईल.

पुण्यापासून बंगळुरूपर्यंत द्रूतगती महामार्ग बांधणार आहे. हा मार्ग फलटणवरून जाणार आहे. त्या महामार्गावर नवीन पुणे शहर तुम्ही वसवायचं. ते मेट्रो आणि रेल्वेने जोडायचं. पुण्यात वाहतूककोंडीची समस्या आहे. त्यामुळे आता मोठ्या शहराचं विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. तसेच, सायरनचा आवाज कान फुटल्यासारखा येतो. जर्मन वायोलिन वादक होता. त्याला आकाशवाणीची एक ट्युन होती. ती ट्युन हॉर्नला लावण्याचे मी आदेश दिले असल्याचंही ते म्हणाले.

पुढे नितिन गडकरी म्हणाले, आम्ही सुट्ट्यात पुण्यात फिरायला यायचो.
माझी मोठी बहीण पुण्यात होती. पर्वतीवर फिरायला जात होतो. त्यावेळी मोकळी हवा होती.
आता पुण्यात प्रदुषण आहे, जलप्रदूषण, वायूप्रदूषणापासून मुक्त करावे. भारतातील सर्वात प्रदूषित शहरं आहेत.
त्यात पुण्याचा वरचा क्रमांक आहे.
पुण्याला प्रदूषणापासून अजित दादांनी मुक्ती द्यावी, असं देखील गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Nitin Gadkari | … so at that time Punekar criticized me and Fadnavis (video) – Nitin Gadkari

हे देखील वाचा :

Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू

Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी कॅम्प संपन्न

EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Related Posts