IMPIMP

OBC Political Reservation | राजकीय उद्देश ठेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं, ‘त्या’ पत्रावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

by bali123
OBC Political Reservation | maharashtra governor asks cm uddhav thackeray to take call on fadnavis demands ncp comment on letter

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन OBC Political Reservation | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र (Letter) लिहलं आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं (Governor Bhagat Singh Koshyari Letter to Maharashtra CM Uddhav Thackeray) आहे. यामध्ये विधीमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद तसेच ओबीसी राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांच्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राजकीय उद्देश ठेवून लिहले पत्र

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा (OBC political reservation) सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे (Raj Bhavan) अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना (CM) लिहिलेले पत्र राजकीय उद्देश (Political purpose) ठेवून लिहले असल्याचे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशावरुन ही परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्याच्या निर्णयामुळे नाही हे त्यांना माहित असायला हवे होते असा टोलाही मलिक (Nawab Malik) यांनी लगावला आहे.

काय म्हटलं पत्रात ?

निवडणुका आधी घ्यायच्या वा लांबणीवर टाकायच्या याचा सर्वस्वी अधिकार हा निवडणूक आयोगाचा (Election Commission) आहे, असे असले तरीही इतर मागासवर्ग आरक्षणाचा (OBC Reservation) विषय प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत या भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाच्या मागणीवर आपण यथोचित कार्यकवाही करावी आणि मला त्याबाबत अवगत करावे, असे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Governor Bhagat Singh Koshyari Letter to Maharashtra CM Uddhav Thackeray) पाठवले आहे.

काय आहे प्रकरण ?

निवडणुका कधी घ्याव्यात, त्या पुढे ढकलाव्यात की रद्द कराव्यात हा अधिकार निवडणूक आयोगाचा.
राज्यांमध्ये हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा (State Election Commission).
त्याच्याशी मुख्यमंत्री (Chief Minister), राज्य मंत्रिमंडळ (State Cabinet) याचा काहीही संबंध नसतो.
ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द झालेल्या 200 जागा खुल्या वर्गातून भरण्याकरिता पोटनिवडणुकीचा (By-election) कार्यक्रम जाहीर झाल्यावर कोरोना (Corona) परिस्थिती गंभीर असल्याने या पोटनिवडणुका (By-election) पुढे ढकलाव्यात,
अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारने (State Government) राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) दिले होते.
यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या निवडणुका होत असल्याने त्या लांबणीवर टाकता येणार नाहीत,
असे राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान (State Election Commissioner U.P.S. Madan) यांनी स्पष्ट केलं होतं.

Web Titel :- OBC Political Reservation | maharashtra governor asks cm uddhav thackeray to take call on fadnavis demands ncp comment on letter

Related Posts