IMPIMP

OBC Reservation | काँग्रेस नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरु, ओबीसी आरक्षणावरुन भाजप नेत्याचा काँग्रेसला टोला

by bali123
obc reservation | congress leader epitome ignorance bjp leader Keshav Upadhye target congress over obc reservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन OBC Reservation | काँग्रेसचे (Congress) नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) केंद्राकडे बोट दाखवतात तर सचिन सावंत (Sachin Sawant) काही पत्राकडे बोट दाखवतात. पण एसईसीसीचा (SECC) डेटा 50 टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी (Reservation) नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली असा पलटवार भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ओबीसी आरक्षणावरुन (OBC reservation) काँग्रेसवर केला आहे. (Congress leader is the epitome of ignorance)

त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग सरकारने आदेश काढला

केशव उपाध्ये यांनी म्हटले की, 2013 मध्ये त्यावेळच्या डॉ. मनमोहन सिंग सरकारने (Dr. Manmohan Singh government) एक आदेश (Order) काढला होता. ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन (Serious and new) प्रश्न निर्माण होतील. केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये दोन लिंक दिल्या आहेत. ते म्हणाले अजूनही विषय समजला नसले तर दोन लिंक ऐका. त्याने 2 फायदे होतील. 1. डोक्यात प्रकाश पडेल 2. आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल, असंही त्यांनी काँग्रेस (Congress) नेत्यांना सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हणाले सचिन सावंत ?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर केवळ आश्वासन द्यायची आणि पूर्ण न करायची. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला (Dhangar Samaj) आरक्षण देऊ असं म्हणाले होते. मात्र 5 वर्षात त्यांनी आरक्षण (Reservation) दिलं नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (OBC political reservation) प्राधान्य भाजपच (BJP) जबाबदार आहे. हा प्रश्न सुटण्यासाठी ओबीसींचा जनगणनेचा अहवाल इम्पिरिकल डेटा (Imperial data) आवश्यक आहे. त्यासाठी फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री असताना केंद्राला 2019 मध्ये पत्र पाठवलं होत. दोन वर्ष भाजप नेत्यांनी मागणी करुनही केंद्र सरकार (Central Government) ती देत नसेल तर त्यात महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi government) चूक ती काय ? असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला होता.

Web Titel :- obc reservation | congress leader epitome ignorance bjp leader Keshav Upadhye target congress over obc reservation

Related Posts