IMPIMP

OBC Reservation | आ. गोपीचंद पडळकरांच्या टीकेला थोरातांच्या कन्या शरयूने दिले प्रत्युत्तर, म्हणाल्या- पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की अस होत

by bali123
OBC Reservation | daughter of balasaheb thorat sharayu deshmukh took action his fathers criticism and taught rites gopichand padalkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन OBC Reservation | तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, 4 महिन्यात ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) देतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे सरकारला दिले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हणत टोला लगावला होता. OBC Reservation | daughter of balasaheb thorat sharayu deshmukh took action his fathers criticism and taught rites gopichand padalkar

त्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (MLA Gopichand Padalkar) थोरातांवर टीका केली होती. मात्र, पडळकरांनी वापरलेली भाषा न रुचल्याने थोरातांच्या कन्या शरयू देशमुख (sharayu deshmukh) यांनी ट्विटरवरूनच पडळकरांना संस्कारी भाषेत टोला लगावला आहे. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार असे ट्विट शरयू यांनी केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आमदार गोपीचंद पडळकरांनी ट्विटरवरून थोरातांना टोला लगावला होता. महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले आहेत. मूळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या 5 वर्षा अगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही, असे म्हटले होते. त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनी पडळकर यांना संस्कारी भाषेत उत्तर दिले आहे.

फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : थोरात (Balasaheb Thorat)

ओबीसीच्या मुद्द्यावरूनच कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी फडणवीसांवर टीका केली होती. सत्तेसाठी काहीही बोलायच ही भाजपची पूर्वीपासूनची पद्धत आहे.
विदर्भ स्वतंत्र होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असेही फडणवीस म्हणाले होेते.
मात्र, त्यानंतर काय झालं हे सर्वांनी पाहिले आहे.
मुळे फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका थोरात यांनी केली होती.

Web Title : OBC Reservation | daughter of balasaheb thorat sharayu deshmukh took action his fathers criticism and taught rites gopichand padalkar

Related Posts