IMPIMP

OBC Reservation | आमच्या हाती सत्ता द्या, 4 महिन्यात आरक्षण देतो अन्यथा राजकीय संन्यास घेतो – फडणवीस (व्हिडीओ)

by bali123
devendra fadanvis addressed on obc reservation bjp chakka jaam nagpur

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन OBC Reservation | ठाकरे सरकारच्या (Thackeray government) नाकर्तेपणामुळेच राज्यातील ओबीसी आणि मराठा आरक्षण गेले आहे. मात्र आपल्या अपयशाचे खापर ते पंतप्रधान मोदीवर फोडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, 4 महिन्यात आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो, असे आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे. तसेच राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मोर्चे काढण्यापेक्षा ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही मदत करु, असे फडणवीस म्हणाले. devendra fadanvis addressed on obc reservation bjp chakka jaam nagpur

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे शुक्रवारी (दि. 26) राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.
नागपुरात व्हरायटी चौकात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे.
देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसींचे आरक्षण असताना महाराष्ट्रातच का नाही
असा सवाल फडणवीसांनी केला. ओबीसींना आरक्षणापासून (OBC Reservation) वंचित ठेवण्यासाठीच राज्य सरकार 15 महिने वेळकाढूपणा केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
तसेच 5 जिल्ह्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्यात येत आहेत.
त्यामुळे भविष्यात ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातल्याचा आरोप फडणवीस
यांनी केला आहे. ओबीसी प्रकरणातील याचिकाकर्ता हा काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

Web Title : OBC Reservation | devendra fadanvis addressed on obc reservation bjp chakka jaam nagpur

Related Posts