IMPIMP

Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा; म्हणाले – ‘…पण दोन हात करायची वेळ आली तर कमी पडणार नाही’

by nagesh
Omraje Nimbalkar | shivsena leader and MP omraje nimbalkar shivsampark abhiyan ncp congress beed

बीड : सरकारसत्ता ऑनलाइनOmraje Nimbalkar | भाजपकडून (BJP) शिवसेनेवर (Shivsena) वारंवार आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या खासदारांना (MP) भाजपच्या आरोपांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यात शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) माध्यमातून खासदारांचे ठिकठिकाणी दौरे सुरू असून आरोपांना प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवाय केंद्रीय तपास यंत्रणांकडून (Central Investigation Agency) सुरू असलेल्या कारवाईवरही टीका करण्यात येत आहे. दरम्यान, बीडमध्ये (Beed) शिवसंपर्क अभियानात शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) तोफ डागली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उस्मानाबादचा पालकमंत्री (Osmanabad Guardian Minister) शिवसेनेचा आहे. तेथे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) धर्म पाळला जातो. पण बीडमध्ये उलट परिस्थिती आहे. तुम्हाला आम्ही त्रास देत नाही तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. दोन हात करायची वेळ आली तर आम्ही कमी पडणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांना ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी दिला आहे.

निंबाळकर बोलताना पुढे म्हणाले की, सध्याच सरकार (Government) तीन पक्षांचं आहे हे कबूल आहे. पण ते चालवताना काही गोष्टी ठरल्या आहेत. पालकमंत्री आणि इतर दोन पक्षांचा वाटा ठरला आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला (Formula) उस्मानाबादमध्ये पाळला जात आहे. पण बीड मध्ये तसे होताना दिसत नाही. येथे त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात उद्धव ठाकरे, अनिल देसाई (Anil Desai) यांच्या कानावर ही गोष्ट घालावी अशी विनंती सकाळीच मी पालकमंत्र्यांना केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उस्मानाबादमध्ये जर फॉर्म्युला पाळण्यास सांगितले जात असेल तर तो बीड मध्येही पाळला जावा.
जो नियम आम्हाला आहे तो तुम्हालाही आहे. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेत आहे.
कोणीही चिंता करू नये. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असताना अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही.
त्याचा जाब विचारण्यात येईल. आम्ही त्रास देत नाही त्यामुळे कृपा करून तुम्हीही त्रास देऊ नका.
दोन हात करायची वेळ आली तर शिवसैनिक कमी पडणार नाही योग्य उत्तर देईल असा इशारा निंबाळकर यांनी दिला.

Web Title :- Omraje Nimbalkar | shivsena leader and MP omraje nimbalkar shivsampark abhiyan ncp congress beed

हे देखील वाचा :

Delhi High Court | घटस्फोटाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Solapur Crime | करमाळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना! चुलत भावाने केले अल्पवयीन बहिणीशी लग्न

Delhi High Alert | दिल्लीत हाय अलर्ट ! तहरिक-ए-तालिबानची बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

Related Posts