IMPIMP

Assembly Election 2021 : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला ‘राम राम’

by bali123
P. C. Chacko | assembly election 2021 live kerala congress leader pc chacko resignation sonia gandhi mute spectator

सरकारसत्ता ऑनलाइन – Assembly Election | दाक्षिणात्य राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीसी चाको ( P. C. Chacko) यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही राहिलेली नाही, असं सांगत त्यांनी राजीनाम्याचं पत्र सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे दिलं आहे.

केरळमध्ये 140 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हेदेखील केरळमधील खासदार आहेत. डाव्या पक्षांच्या ताब्यातील केरळमधील सत्ता पुन्हा एकदा घेण्यासाठी काँग्रेसनं जोरदार कंबर कसली आहे. त्यातच आता वरिष्ठ नेत्यानं पक्ष सोडल्यानं काँग्रेसला धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

‘काँग्रेस हायकमांड केरळच्या फक्त दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून निर्णय घेतं’


दरम्यान, चाको P. C. Chacko  यांनी पत्रकार परिषद बोलावून पक्षातील कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली होती.
ते म्हणाले होते की, काँग्रेस हायकमांड केरळच्या फक्त दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून निर्णय घेतं. पक्षात लोकशाही नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णयदेखील या दोघांनीच घेतला.
हाय कमांडनं फक्त त्यांनी सांगितलेल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं, असा थेट आरोप त्यांनी केला.
काँग्रेस हायकमांड मुक्यानं हे सारं पाहात राहतं, असं म्हणत त्यांनी सोनिया गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

‘माझ्या राजीनाम्यानं किमान डोळे उघडले तरी माझा निर्णय सार्थकी लागला’


पुढं बोलताना ते म्हणाले, गेले अनेक दिवस पक्ष सोडण्याचा विचार डोक्यात घोळत होता.
दिवसेंदिवस पक्ष कमजोर होत आहे.
माझ्या राजीनाम्यानं किमान डोळे उघडले तरी माझा निर्णय सार्थकी लागला असं मी समजेन.

केंद्रीय मंत्र्याची ममता बॅनर्जींवर टीका; म्हणाले – या फक्त ‘निवडणुकीपुरत्या हिंदू’ (व्हिडिओ)

Related Posts