IMPIMP

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

by pranjalishirish
Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis takes a dig at ncp chief sharad pawar on babasaheb ambedkar jayanti

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा ही विधानसभेची जागा रिक्त होती. त्यामुळे आता या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. त्यावरून फडणवीस Devendra Fadnavis यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात आयोग स्थापन करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आयोग नेमला नाही. त्यामुळे या नालायक महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगरपालिकेतील ओबीसी, व्हीजेएटी या समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे भविष्यात या समाजाचे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण धोक्यात येईल.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

तसेच हे सरकार लोकहिताच्या विरोधी आहे. सत्तेवर आले तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार होते. पण आता हे महावसूली सरकार आहे. लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसवर बोलताना फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आपल्या राज्यात आहेत. एकट्या महाराष्ट्रात 55 टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहेत. लॉकडाऊन करताना ज्यांचे पोट बंद होतं त्यांना मदत करणं गरजेचं आहे, छत्तीसगड राज्याने तेथील शेतकऱ्यांना मदत केली.

Read More : 

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts