IMPIMP

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

by Team Deccan Express
pandharpur by election 2021 bjp leder chandrakant patil slams ajit pawar

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – ‘राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर-मंगळवेढ्यात येऊन गल्लोगल्लीत फिरावं लागत आहे. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत. सत्तेत असलेल्या व्यक्तीने नम्र राहावे. पण अजित पवार मान वरून चालत आहेत. अजित पवार जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं याची जाणीव ठेवा, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी टोला लगावला.

चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना थेट इशारा, म्हणाले – ‘मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा…’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेली. आवताडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी अजित पवारांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, ‘अजित पवार जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं याची जाणीव ठेवा. राज्यात सत्तांतर कसं होईल, कधी होईल हे सर्व तुम्हाला माहीत आहे. मात्र, आता जे सत्तांतर होईल ते आमच्या जीवावर होईल. अजित पवार हे सत्तेसाठी हपापले आहेत. म्हणूनच त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपद घेतले होते. सत्ता कोणाची असली तरी यांना उपमुख्यमंत्रिपद हवे असते’, असा टोलाही पाटील chandrakant patil यांनी लगावला.

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

तसेच ते पुढे म्हणाले, ‘अजित पवारांना काय झालं माहीत नाही. ते अलीकडे जरा जास्तच जोरात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचं म्हटलं होतं आता मी अजित पवारांवर एम. फिल. करणार आहे. सिंचन घोटाळा, शिखर बँक प्रकरण यांची चौकशी असताना अजित पवार कशाच्या जीवावर बोलत आहेत, हे कळत नाही असं सांगत सध्या राष्ट्रवादीचे काही मंत्री सुपात तर काही जात्यात आहेत’.

Also Read :

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

Related Posts