IMPIMP

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

by nagesh
pandharpur election dcm ajit pawar criticized bjp devendra fadnavis campaigning

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. ही पोटनिवडणूक असली तरी सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात खरी लढत होत आहे. यामुळे प्रचारानिमित्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन्ही पक्षांचा ही निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने प्रचाराच धडका सुरु असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. अशातच भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार कधी बदलायचं माझ्यावर सोडा असे विधान केले होते. या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी फडणवीस यांना सणसणीत प्रतिटोला लगावला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; तब्बल 2.5 हजार पोलिस राहणार तैनात

उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar म्हणाले की, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडाणं म्हणजे खेळ वाटतो का ? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिटोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

आपला नाद कोणी करायचा नाही, केलाच तर…
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला अजित पवार ajit pawar यांनी पहिल्यांदाच थेट प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत अजित पवारांची नक्कल करण्यात आली होती. यावरुन आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर.. असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. फडणवीस यांनी पावसात सभा घेतल्याचाही अजित पवारांनी समाचार घेतला. तुम्ही कुठे अन् साहेब कुठं असं सांगत अजित पवारांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

विरोधी पक्षनेते पद 5 वर्षे टिकून राहील का ?
जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, भाजप प्रचार करताना सांगत आहे की, आम्हाला भारत भालकेंबद्दल आदर आहे. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे ? भाजपकडे आता कार्यकर्त्यांची कमतरता आहे. कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळत नसल्याने कार्यकर्ते महाविकास आघाडीची वाट धरत असल्याचे चित्र आहे. हे चित्र पहाता देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद 5 वर्षे टिकून राहील का ? असा टोला जयंत पाटील यांनी लागावला.

Also Read :

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

Related Posts