IMPIMP

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेचं ट्विट; म्हणाल्या – ‘परळी सुन्न आहे…’

by nagesh
Maharashtra Political Crisis | pankaja munde bjp worker shouted make pankaja munde cm of maharashtra political crisis beed news

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन  करुणा शर्मा- मुंडे प्रकरण आणि दोन दिवस घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी महाराष्ट्रात खळबळ उडाली. या झालेल्या प्रकरणावर विरोधकही गप्प असताना भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कोणाचेही नाव न घेता, “परळी सुन्न आहे. मान खाली गेली आहे राज्याची” असे म्हणत ट्विट केले आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विटमधुन शासन, प्राशन आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या ट्विटवरुन राज्यात खळबळ माजली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अंबाजोगाईच्या सत्र कोर्टाने (Sessions Court) करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
सुनावली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबद्दल गौप्यस्फोट करण्यासाठी करुणा शर्मा परळीत (Parli)
पत्रकार परिषद घेणार होत्या. तत्पुर्वी परळीत एका व्यक्तीवर चाकू हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यावरुन पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं
आहे.

नेमकं काय आहे ट्विट

अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.
शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. wrong
president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे
राज्याची अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबाबत अनेक गोष्टीचे पुरावे देणार असल्याचे जाहीर केले. परळीत त्यांनी पत्रकार परिषदेत
या गोष्टी उघड करू असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु, आपल्याला जिवंत जाळण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं
होतं. यासाठी परळीत जाण्यापुर्वीच करुणा शर्मा यांना अठक केली. दरम्यान, त्यांच्या गाडीत पिस्तुल देखील आढळले होते.

Web Title : Pankaja Munde | pankaja munde reaction on karuna sharma arrest parali

हे देखील वाचा :

Kopardi Rape Case | कोपर्डी प्रकरणाची लवकर सुनावणी होण्यासाठी शासनाची उच्च न्यायालयाला विनंती

Parambir Singh Case | चांदीवाल कमीशनने परमबीर सिंह यांच्याविरूद्ध जारी केले वॉरंट

Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण ! आरोपींना वकील आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी न्यायालयाने दिला वेळ, आता ‘या’ तारखेला आरोप निश्चिती

Related Posts