IMPIMP

Param Bir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत प्रचंड वाढ ! 2 कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

by bali123
Param Bir Singh | Second case of extortion registered against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh.

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (former mumbai police commissioner param bir singh) यांच्याविरूध्द आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल (Extortion Case) करण्यात आहे. परमबीर सिंह यांच्यासह इतर 6 जणांवर हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीमध्ये 2 कोटी रूपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात (marine drive police station) कालच (गुरूवार) परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यासह 6 पोलिस अधिकारी आणि इतरांवर अशा एकुण 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयाला दाखल होऊन काही तास झाल्यानंतर हा खंडणीचा दुसरा गुन्हा परमबीर सिंह यांच्याविरूध्द दाखल झाल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांच्याकडे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (former home minister anil deshmukh) यांच्याबाबत तक्रार केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने central bureau of investigation (सीबीआय) CBI अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अंमलबजावणी संचनालयाने (enforcement directorate) देखील अनिल देखमुख यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. एवढेच नव्हे तर ईडीनं अनिल देशमुख यांची मालमत्ता देखील जप्त केली आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होत आहे. परमबीर सिंह यांची यापुर्वीच चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मात्र, सध्या परमबीर सिंह हे सीक रजेवर आहेत. गुरूवारी परमबीर सिंह (former mumbai police commissioner param bir singh) यांच्यासह 6 पोलिस अधिकार्‍यांवर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रंचड खळबळ उडाली होती. आता तर 2 कोटी रूपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासह इतर कोणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह ज्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे त्याचीच नावे देखील या गुन्हयात देखील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांवर अशा पध्दतीनं खंडणीचे गुन्हे दाखल होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
राज्यात देखील एखाद्या आयपीएस अधिकार्‍यावर (Extortion Case Against IPS) अशा प्रकारचे खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याची देखील पहिलीच वेळ म्हणावी लागेल.
परमबीर सिंह हे सध्या महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस महासंचालक (होमगार्ड) director general of police home guard maharashtra या पदावर कार्यरत आहेत.
पोलिस महासंचालक पदावर कार्यरत असताना परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडली आहे.

Web Title :Param Bir Singh | Second case of extortion registered against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh.

Related Posts