IMPIMP

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

by pranjalishirish
phone tapping bjp asks what share does congress gets

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भात आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये फोन टॅपिंग प्रकरणात राज्यपालांनी हस्ताक्षेप करावा अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली अशी माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली आहे. या शिष्टमंडळाने राज्याला वाचवणे गरजेचं आहे त्यामुळेच राज्यपालांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावे अशी विनंती केल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर congress  टीका करताना काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे असा टोला लगावला आहे. तसेच त्यांनी काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे असेदेखील म्हणाले आहे.

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या खूपच चिंताजनक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. “मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातील मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक आहे. शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला,” अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसवर congress देखील सडकून टीका केली आहे. “काँग्रेस  congress अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलतायत. इथले नेते वेगळं बोलतायत. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही,” असा टोलादेखील फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा आहे असा सवालदेखील फडणवीस यांनी विचारला आहे.

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. त्याचप्रमाणे या बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, याचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा ही आमची मागणी असल्याचे भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. तसेच १०० पेक्षा अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. काल देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील पोलीस दलामधील बदली घोटाळ्यासंदर्भात धक्कादायक आरोप करण्यात आले. काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिवांना भेटून यासंदर्भातील पुरावेसुद्धा दिले आहेत. या पोलीस दलातील बदल्यांसंदर्भातील घोटाळ्यांच्या आरोपावरुन राज्यातील राजकारण अजूनच तापले आहे.

Aslo Read : 

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts