IMPIMP

PM-Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2,000 रुपये, तात्काळ चेक करा डेट

by nagesh
PM Kisan | 4000 rupees will be credited in farmers account-after 18 days check details PM Kisan Samman Nidhi Yojana Modi Government Marathi News

नवी दिल्ली : वृत्त संस्थाPM-Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi scheme) 9 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी खुशखबर आहे. सरकार लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कृषी मंत्रालय 9 ऑगस्टपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते. हे पैसे कोण-कोणत्या खात्यात आले आहेत हे जाणून घेणे खुप सोपे आहे. (PM-Kisan) लिस्टमध्ये असे चेक करा तुमचे नाव :

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

असे चेक करा आपले स्टेटस

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.

लिस्टमध्ये असे चेक करा अपले नाव

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

स्वत: करा चुक दुरूस्त

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्ही https://www.pmkisan.gov.in/updateaadharnobyfarmer.aspx येथे क्लिक करा. याशिवाय जर तुमच्या नावात चूक असेल किंवा अकाऊंट नंबर दुरूस्त करायचा असेल तर वेबसाइटच्या होम पेजवर तुम्ही Benificary status वर क्लिक करून ते दुरूस्त करू शकता.

Web Title  : pm kisan 9th installment rs 2000 to be deposited account on this date how to check your name

हे देखील वाचा :

IT Recruitment 2021 | आयटी क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ कंपनीत 10 हजार जागांसाठी भरती होणार

Tihar Jail | दिल्‍लीच्या तिहार तुरुंगात गँगस्टर अंकित गुर्जरचा संशयास्पद मृत्यू

Vasai Crime | वसई किनाऱ्यावर आढळला आणखी एका तरुणीचा मृतदेह; परिसरात खळबळ; आठवड्याभरातील दुसरी घटना

Related Posts