IMPIMP

PMRDA | पीएमआरडीएचा विकास आराखडा जाहीर ! धरणे, कालवे परिसरात 20 टक्के बांधकामास परवानगी

by bali123
PMRDA Election | pmrda election bjp won 14 seats congress lost election

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांसह संपूर्ण हद्दीचा प्रारूप विकास आराखडा (Development plan) प्रसिद्ध केला आहे. या आराखड्यात पर्यावरण पूरक आणि पारंपारिक शेती टिकवण्यासाठी अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पीएमआरडीएच्या (PMRDA) हद्दीतील धरणे, कालवे, नैसर्गिक जलस्त्रोतांच्या परिसरात क्रॉंक्रिटचे बांधकाम होऊ नये याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. त्यावरील सर्वांच्या परिसरात जी-2 झोन (G-2 zone) दर्शविण्यात आला आहे. या झोनमध्ये एकूण क्षेत्रफळाच्या 20 (0.2) टक्के बांधकाम (Construction) करण्यास परवानगी देऊ केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सात हजार चौरस किलोमीटरची पीएमआरडीएची हद्द आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हद्दीला लागून असलेल्या अनेक गावात शेती संपुष्टात आली आहे.
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहे.
त्यापैकी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या हद्दीला लागून अजूनही काही शेती टिकून आहे. विशेषतः कालव्यांच्या आणि नैसर्गिक जलस्त्रोतांच्या बाजूला असलेल्या भागातआजही शेती केली जाते. त्यामुळे याला धक्का पोहचू नये यासाठीच त्यांचा समावेश जी-2 झोनमध्ये करण्यात आले आहे.

प्रिमिअर शुल्क भरून वाढीव बांधकामास परवानगी

जी-2 झोन हद्दीत असणाऱ्या नदी-नाले, धरणे, कालवा यांच्या परिसरात बांधकामांवर बंधने घालण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाकडून त्यासाठी कमांड एरिया निश्‍चित केले असून त्‍यावर जी-2 झोन हा दर्शविण्यात आला आहे.
‘पीएमआरडीए’च्या हद्दीत निवासी भागात मान्य एक एफएआय FSI (चटई क्षेत्र निर्देशांक) वापरून बांधकाम करण्यास परवानगी दिली असून जी-2 झोनमध्ये बांधकामावर मर्यादा आणून 20 (0.2) टक्केच बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, या आराखड्यामध्ये शेती विभागात म्हणजे ‘जी- 1 झोन’ मध्ये प्रिमिअर शुल्क भरून, वाढीव बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे.
तर गावठाणाच्या हद्दीपासून पाचशे मीटरच्या परिसरातही एक एफएसआय वापरून बांधकाम करता येणार आहे.

Web Title : PMRDA | permission to construct 20 percent of dams and canals pune

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आला, आम्ही काही बोललो का? राऊतांचा पलटवार

SSY | ‘या’ बँकेची विशेष ऑफर ! 250 रुपयात उघडा हे खाते, थेट 15 लाखाचा होईल फायदा, जाणून घ्या कसे?

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती

LPG Connection | खुशखबर ! मोदी सरकार देणार मोफत गॅस कनेक्शन, कोणत्याही पत्त्यावर घेऊ शकता; लागू करताहेत ‘हा’ नियम

Related Posts