IMPIMP

पूजा चव्हाणची शेवटची FaceBook पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल ! जाणून घ्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय

by sikandershaikh
pooja-chavan

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी दि 7 फेब्रुवारी 2021 रोजी ही घटना घडली होती. भाजप (Bharatiya Janata Party – BJP) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) मध्ये शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे दोषी आहेत असा आरोप करत आहेत. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. असं असलं तरी तपास अद्याप म्हणावा तसा पुढं सरकलेला नाही. आता पूजा चव्हाण हिची अखेरची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

पूजा चव्हाणनं (pooja chavan) तिच्या अखेरच्या फेसबुक पोस्टमधून हिंदू या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर टीका केली होती. सध्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली पूजा ?

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पूजा म्हणाली होती की, 8 हजार वर्षांपूर्वी सिंधू संसकृती व्यापार, चिकित्सा,
जहाज बांधणी, इंजिनियरींगमध्ये एवढी उन्नत कशी होती याचा शोध इतिहासकार घेत आहेत.
परंतु खानदेशी लेखक भालचंद्र नेमाडे हे देशी दारू पिऊन त्यावर कादंबीर लिहित आहेत.
असल्या मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध असं तिनं लिहिलं होतं.
18 जानेवारी रोजी पूजानं सायंकाळी ही पोस्ट फेसबुकवरून शेअर केली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पूजाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या पोस्टवर अनेकांनी अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही पोस्ट शेअर देखील केली आहे.

दम्यान पूजा चव्हाण (pooja chavan) आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे.
भाजपचा या प्रकरणी आधीपासूनच आक्रमक पवित्रा आहे.
भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नुकतीच पूजा चव्हाण राहात असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं होतं.
सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला होता.

Pooja Chavan Suicide Case : चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या, म्हणाल्या- ‘आत्महत्येच्याच दिवशी संजय राठोडचे 45 मिस कॉल’

Related Posts