Prakash Mahajan on Narayan Rane | ‘तुम्हाला भिणारे दुसरे असतील, मी कुठे येऊ सांगा’; मनसे नेते प्रकाश महाजन यांचे नारायण राणे यांना आव्हान

Prakash Mahajan on Narayan Rane | 'There will be others who fear you, tell me where I should come'; MNS leader Prakash Mahajan challenges Narayan Rane
June 10, 2025

मुंबई :   Prakash Mahajan on Narayan Rane | मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यातील शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून महाजन यांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली होती. यानंतर प्रकाश महाजन यांना अनेक धमकीचे फोन आले होते. आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणे यांना आव्हान देणारी भाषा केली आहे.

प्रकाश महाजन म्हणाले की, मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला तयार आहे. नारायण राणे मी कणकवलीत येतो, करायला लावा उलट्या. मला लेचपेचा समजू नका. माझ्या नेत्यावर टीका करणार, मी काय तुमच्या मुलावर फुले उधळू का, असा सवालच त्यांनी केला आहे.

पुढे महाजन म्हणाले की, उध्दव ठाकरे यांना उध्दव म्हणतो हा , तुझ्या वयाचे आहेत का ते?. तुम्हाला भिणारे दुसरे असतील, मी कुठे येऊ सांगा. दिल्ली, मुंबई किंवा कणकवलीतल्या घरी येतो. जीवाला भिलो असतो, तर एक शिक्षकाचा मुलगा राजकारणात आला नसता. नारायण राणे आता भाजपमध्ये आलेत. बाळ स्वयंसेवक आहे मी, आणीबाणी भोगलीय. “दुर्देव आहे ज्या गोपीनाथ मुंडेंनी राज्यातील गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला, त्या भारतीय जनता पार्टीत असे गुन्हेगार येऊन बसले आहेत, अशा शब्दात महाजन यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, आज मी क्रांती चौकात उभा राहणार आहे. ज्यांना माझे घर माहीत नाही, त्यांनी क्रांती चौकात यावे आणि काय करायचे ते करावे, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.