IMPIMP

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

by bali123
Prithviraj Chavan | Uddhav Thackeray should also be made the prime minister says congress leader and ex cm prithviraj chavan

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) काँग्रेस नेते (Congress Leader) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे यांना थेट पंतप्रधान (PM) केलं पाहिजे, असं म्हटलं आहे.पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होऊ लागली असून अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढे लोकप्रिय आहेत कि त्यांना पंतप्रधानसुद्धा केलं पाहिजे. त्यामुळे लोकाभिमुख प्रशासन देणे, हे शक्य आहे. ते लोकांना केंद्रभागी ठेवून करता येते,’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सात वर्षानंतर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अकार्यक्षम आहेत, याचा साक्षात्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) कसा झाला ? अशा अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिपदावर का ठेवले ? त्यामुळे देशाचे किती नुकसान झाले आणि त्याला जबाबदार कोण?’ असा सवालही त्यांनी उपस्थित करत मोदींना सतत प्रसिद्धी हवी असते, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

नाना पटोले यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्याची पाठराखणही
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला पक्षाची वाढ करायची
असते. त्यामुळेच काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी पटोले स्वबळाची भाषा बोलले असावेत. मात्र,
त्यांच्या विधानांचा विपर्यास केला जात आहे.

Web Titel : Prithviraj Chavan | Uddhav Thackeray should also be made the prime minister says congress leader and ex cm prithviraj chavan

Related Posts

Leave a Comment