IMPIMP

Pune Ambil Odha Slum । ‘माझा काय संबंध अन् मला का बदनाम करताय’? – उपमुख्यमंत्री अजित पवार

by bali123
pune ambil odha slum controversy ncp ajit pawar said what is my relation? why are notorieting me

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Ambil Odha Slum । काही दिवसापूर्वी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) दांडेकर पुलानजीक असलेल्या आंबिल ओढा परिसरातील (Pune Ambil Odha Slum) अतिक्रमण कारवाई केली होती. अतिक्रमण कारवाई दरम्यान वाद उफाळला होता. त्यावेळी पोलीस (Police) आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांस टीकाटिपणी करू लागले. याच मुद्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ‘पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील (Pune Ambil Odha Slum) घरांवरील कारवाईचा आणि माझा काय संबंध ? मला का बदनाम केले जात आहे, अशी विचारणा करीत या कारवाईत हस्तक्षेप नसल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी पवार हे मंगळवारी मुंबईतील एका बैठकीत बोलत होते.

पुण्यातील आंबिल ओढा (Pune Ambil Odha Slum) कारवाईमागे पवार यांचा हात असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावर पवार यांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील विविध प्रश्न, त्यावरील अंमलबजावणी अडथळे आणि उपाय यावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. त्यावेळी आंबिल ओढ्याभोवती सीमाभिंत बांधण्याचा विषय चर्चेत आला होता. त्यावेळी पवार म्हणाले, आंबिल ओढा परिसरातील घरांवरील कारवाईचा संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘आंबिल ओढ्यालगत सीमाभिंती उभारणीबाबतच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्याशी बोलून येत्या शुक्रवारी निर्णय घेऊ, असं ते म्हणाले दरम्यान,आंबिल ओढ्याभोवती सीमाभींत का बांधली जात नाही, याची विचारणा करीत पवार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pune municipal corporation commissioner vikram kumar) यांच्याशी चर्चा केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बैठकीदरम्यान बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘पावसाळ्यात आंबिल ओढ्याला (Ambil Odha) पुराचा धोका असल्याने सीमाभिंत बांधण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी त्यातील नेमकी कार्यवाही करण्यासाठी पुण्याचे महापौर आणि महापालिकेतील अन्य पदाधिकान्यांशी चर्चा केली जाईल. तेव्हा निर्णय करू. सीमाभिंत बांधण्याचा ठराव झाला तरी, पुणे महापालिका प्रशासन (Pune Municipal administration) टाळाटाळ करीत असल्याकडे आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), सचिन दोडके (sachin Dodke), विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Leader of Opposition Deepali Dhumal), नगरसेविका आश्विनी कदम (Corporator Ashwini Kadam) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे लक्ष वेधले.

या दरम्यान, पुण्यातील समस्यांबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित मुंबईत बैठक घेण्यात आली.
मात्र, या बैठकीला महापौरांना बोलविले नसल्याने महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांनी ‘ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्ती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या बैठकीला महापौर, भाजप (BJP) नेत्याना डावलल्याची चर्चा राजकीय वातावरणात निर्माण झाली आहे.
परंतु, पवार (Ajit Pawar) यांनी महापौराची नाराजी दूर करत त्यांच्या नात्यातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने ते आले नसल्याचे सांगितले आहे.

Web Title : pune ambil odha slum controversy ncp ajit pawar said what is my relation? why are notorieting me

Related Posts