IMPIMP

Pune BJP | घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले ! महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’; शहर भाजपच्या महिला अध्यक्षा अर्चना पाटील यांची माहिती

by nagesh
Corporator Archana Tushar Patil | Savitribai Phule Educational Award from Pune Municipal Corporation will start now! Success to the demand of corporator Archana Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या (Thackeray government) नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरू असून सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई (criminals Action) करण्याची पोलिसांची (Police) हिंमत राहिलेली नाही. त्यामुळे आता महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार असून अत्याचाराविरोधातील संघर्षास महिलांना बळ दे, असे साकडे सरकारी दडपशाहीमुळे बंद असलेल्या मंदिरांसमोर जाऊन श्रीगणेशाच्या चरणी घालण्यात येणार आहे. महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी गणरायाने ठाकरे सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी भाजपच्या (Pune BJP) वतीने राज्यात सर्वत्र हे ‘साकडे आंदोलन’ करण्यात येईल. अशी माहिती शहर भाजपच्या (Pune BJP) महिला अध्यक्षा नगरसेविका अर्चना पाटील (Archana Patil) यांनी दिली.

महिलांचा सन्माम राखण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात (Cabinet) मानाचे स्थान मिळत आहे.
तर इकडे राज्यात मात्र, ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस गाठला आहे.
राज्यात गणेशात्सव (Ganesha festival) सुरू होत असताना अनेक कुटुंबे अत्याचारांच्या भयाने धास्तावली असून त्यांना संरक्षण देण्यात ठाकरे सरकार कुचकामी ठरले आहे.
त्यामुळे आता गणरायानेच महिलांना अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ द्यावे अशी प्रार्थना यावेळी केली जाईल, अशी माहिती शहर भाजपच्या महिला अध्यक्षा अर्चना पाटील यांनी गुरुवारी दिली.

अर्चना पाटील म्हणाल्या, पुण्यात वानवडी (Wanwadi in Pune) येथे 14 वर्षांची अल्पवयीन
बालिका आणि 25 वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या (gang rape) घटनांनी
महाराष्ट्र हादरला असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना ठाकरे सरकार मात्र कोरोनाच्या (Corona) नावाने राजकारण करत निष्क्रीयपणे घरात बसून आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुरोगामी महाराष्ट्रातील वानवडी येथील गौरी गायकवाड (Gauri Gaikwad) नावाच्या महिला सरपंचास सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्याने मारहाण केल्यानंतरही कारवाई होत नाही.
उलट नागरिकांची लसीकरणाची सुविधाच बंद करून जनतेच्या जिवाशी खेळ केला जातो.

औरंगाबादला (Aurangabad) ऊसतोड मजूर महिलेचे अपहरण (Kidnapping) केले जाते, आणि सरकार मात्र हातावर हात ठेवून ढिम्म राहते.
ठाण्यात (Thane) पालिकेच्या अधिकारी महिलेवर भर रस्त्यात हल्ला करून तिची बोटे छाटली जातात. महाराष्ट्रात विकृत गुन्हेगारांची हिंमत वाढली असून महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत.
अशा परिस्थितीत सरकारी कृपेने गुन्हेगारी करणाऱ्यांशी संघर्ष करण्याची हिंमत गणरायाने राज्यातील महिलांना द्यावी अशी प्रार्थना बंद मंदिरासमोर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवरही अत्याचार झाले असून अशा वाढत्या घटनांमुळे महिलांनी घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली आहे.
जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही.
घरबसल्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे पाहात निष्क्रिय राहिलेल्या ठाकरे सरकारला आता गणरायानेच सुबुद्धी द्यावी.
असे त्यांनी म्हटले आहे. गणरायाच्या थेट मुखदर्शनावरही बंदी घालणारे ठाकरे सरकार सण आणि
उत्सवांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले असून घरात बसून स्वतःचे तोंड लपविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा
देवाच्या मुखदर्शनाला विरोध का, असा सवालही त्यांनी केला.

Web Title : Pune BJP | Atrocities increased due to housewife government! ‘Sakade Andolan’ in front of BJP’s Ganaraya for women’s safety; Information of city BJP women president Archana Patil

हे देखील वाचा :

Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मुंबईच्या जेलमध्ये मृत्यू

Kirit Somaiya | ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

Kolhapur Crime | खळबळजनक ! प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय शाळकरी मुलाची हत्या

Related Posts