IMPIMP

Pune Corporation | भाजपच्या नेत्याने थेट किरीट सोमय्यांनाच पालिकेत आणल्याने शहर भाजप नेतृत्वाच्या ‘क्षमते’बाबत उलटसुलट चर्चा

‘भावकी’च्या जमिनीच्या वादात पालिका प्रशासन सहकार्य करत नाही !

by nagesh
Pune Corporation | BJP leader brings Kirit Somaiya directly to the BJP

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune Corporation | ‘भावकी’मध्ये सुरु असलेल्या ‘जमिनी’च्या वादात महापालिका प्रशासनाचे (pmc administration) सहकार्य मिळत नसल्याचा दावा करत महापालिकेतील (Pune Corporation ) सत्ताधारी भाजपच्या (BJP) पुण्यातील एका बड्या पदाधिकार्‍यांने महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) सातत्याने आरोप करणारे पक्षाचे ‘फायरब्रँड’ नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनाच आज महापालिकेत आणले होते. विशेष असे की सोमय्या यांनी देखिल महापालिका अधिकार्‍यांना ‘सहकार्य’ करा अशी तंबी दिली, त्याचवेळी पत्रकारांना ‘कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा आढावा’ घेण्यासाठी आल्याचे सांगत ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ अशी माहिती दिली. मात्र यावरून सत्ताधारी भाजपला प्रदेशाअध्यक्ष, दोन खासदार, सहा आमदार, महापौर आणि शंभर नगरसेवक असताना ‘सोमय्यांची’ का मदत घ्यावी लागली? यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेले अनेक वर्षांपासून विरोधी पक्षांच्या सरकारने केलेल्या घोटाळ्यांबाबत जाहीर आरोप करत आहेत.
व्यवसायाने चार्टड अकाउंटंट असलेले सोमय्या यांनी या आरोपांच्या माध्यमातून अनेक विरोधकांना अंगावर घेतले आहे.
युती शासन काळात काहीसे बाजूला पडलेल्या सोमय्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena)
आणि कॉंग्रेसच्या (Congress) मंत्र्यांची प्रकरणे काढून हल्लाबोल सुरू केला आहे.
सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा शेल कंपन्यांच्या माध्यमांतून कमी किंमतीत खरेदी विक्री केल्याचे प्रकरण गाजत आहे.
तसेच राष्ट्रवादीचे असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही जवळच्या नातेवाईकांना कोट्यवधींची कंत्राटे दिली आहेत.
यावरूनही सोमय्या यांच्या मागील काही महिन्यांपासून पुणे व पश्‍चिम महाराष्ट्रात सातत्याने दौरे होत आहेत.
अशातच अजित पवार यांच्या निकटवर्तीय आणि कुटुंबियांच्या घरांवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे घातल्याने सोमय्या यांचे भाजपमधील वजन ‘वधारले’ आहे.

यामुळेच भापजच्या एका बड्या पदाधिकार्‍याने भावकिच्या जमिनीच्या वादात लक्ष घालण्यासाठी थेट सोमय्या यानांच महापालिकेत (Pune Corporation)
पाचारण केल्याने भाजपसह अन्य राजकिय पक्ष व अधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूडचे आमदार. ते सातत्याने महापालिकेमध्ये (Pune Corporation) आढावा बैठक घेतात.
पुणे भाजपचा चेहेरा असलेले पाचवेळा मंत्री, पालकमंत्री असलेले खासदार गिरीश बापट, माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह ६ आमदार, महापौर, सभागृहनेता,
स्थायी समिती अध्यक्ष आणि तब्बल १०० नगरसेवक असताना त्यांचा अभ्यास, पालिका प्रशासनावर पकड नाही? अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सोमय्या यांना पहिल्यांदाच पालिका भेटीमागील उद्देश विचारला असता त्यांनी ‘कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा आढावा घेण्यासाठी ’ गेलो होतो, असे हसतच उत्तर देत प्रश्‍नाला बगल दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Pune Corporation | BJP leader brings Kirit Somaiya directly to the BJP

हे देखील वाचा :

RIL | रिलायन्सची जर्मनीच्या नेक्सवेफमध्ये (NexWafe) गुंतवणूक, डेन्मार्कच्या स्टीसडलसह (STIESDEL) सामरिक भागीदारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,139 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 121 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts