IMPIMP

Pune Corporation | …म्हणून केबल नियमीतीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी – हेमंत रासने

by nagesh
Hemant Rasne | Hemant Rasane's petition in the high court against the Pune Municipal Corporation (PMC), find out what the case is

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन शहराचा विस्तार होत असताना विकासासाठी निधीही मोठ्याप्रमाणावर लागणार आहे. यासाठी महापालिकेचे (Pune Corporation) उत्पन्न वाढविण्याची (Income of PMC) गरज आहे. याचाच एक भाग म्हणून शहराचे विद्रुपीकरण करणार्‍या ओव्हरहेड केबल्स (overhead cables)अंडरग्राउंड करतानाच त्यातून महापालिकेलाही (Pune Corporation) उत्पन्न मिळेल, यासाठी केबलसाठी स्वतंत्र धोरण तयार केले. असे धोरण तयार करणारी पुणे ही देशातील एकमेव महापालिका ठरली, असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasne) यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

शहराचे विद्रुपीकरण करणार्‍या इंटरनेट, ब्रॉडबँड केबल्स टप्प्याटप्प्याने अंडरग्राउंड करण्यासाठी महापालिकेने धोरण तयार केले आहे. स्थायी समितीच्या मान्यतेने या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या धोरणानुसार शहरातील बेकायदा ओव्हरहेड व अंडरग्राउंड केबल्स शोधून दंड आकारून त्या नियमीत करण्यात येणार आहे. बेकायदा केबल्स शोधण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले असून या कंपनीने मागील दोन महिन्यांत शहरातील तब्बल ७ हजार ४४० कि.मी.च्या विविध ब्रँडेड कंपन्यांच्या बेकायदा ओव्हरहेड केबल शोधून काढल्या आहेत. तशी संबधित कंपन्यांना नोटीसही दिली आहे. दंड आकारून या केबल्स नियमीत केल्यास महापालिकेला १० हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार आहे.

यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले २३ गावांचा समावेश झाल्यानंतर पुणे महापालिका (Pune Corporation) भौगोलिकदृष्टया देशातील सर्वात मोठी महापालिका झाली आहे. या गावांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून काहीच निधी उपलब्ध झालेला नाही. शहरातही मोठे प्रकल्प सुरू आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणावर निधीची गरज आहे. शासनाकडून फारशी अपेक्षा नसल्याने मी प्रशासनाच्या मदतीने उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. मिळकतकर, बांधकाम परवाना शुल्क, GST हे उत्पन्नाचे पारंपारिक स्त्रोत आहेत. त्यालाही मर्याद आहेत. त्यामुळे नवीन पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

याचाच एक भाग म्हणून शहराचे विद्रुपीकरण करणार्‍या ओव्हरहेड केबल्स नियमीतीकरणाचे धोरण राबविण्यात येत आहे. पुण्यातील इंटरनेटचा वापर वाढत असताना यातून महापालिकेला उत्पन्न मिळावे, तसेच हे धोरण राबविताना इंटरनेट सेवेतही खंड पडणार नाही असा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळणार असून समाविष्ट गावांसह शहराच्या विकासासाठी याचा उपयोग होईल, असा दावाही रासने यांनी यावेळी केला.

Web Title : Pune Corporation | … hence the implementation of cable regularization policy – Hemant Rasane

हे देखील वाचा :

Pune Mumbai-Expressway | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या दोन तास ‘ब्लॉक’, वाहतुकीत केला ‘हा’ बदल

Gold Hallmarking | सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग 256 जिल्ह्यांमध्ये लागू, सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राला करायचाय विस्तार; जाणून घ्या यामुळे होतो कोणता लाभ ?

Crime News | भर पोलीस चौकीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Related Posts