IMPIMP

Pune Corporation | भाजपच्या मागणीला ‘कात्रज’ चा घाट ! 23 गावांच्या विकास आराखड्यावर शहरातील लोकप्रतिनिधींनी सूचना कराव्यात – अजित पवार

by bali123
Pune Corporation | People's representatives should make suggestions on development plans of 23 villages - Deputy Chief Minister Ajit Pawar

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Corporation | मुख्यमंत्र्यांनी कालच पीएमआरडीएचा (PMRDA) विकास आराखडा प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली आहे. पुणेच न्हवे तर आजूबाजूचे जिल्ह्यांचा पुढील 50 वर्षांचा विचार करून वाहतूक, शिक्षण, उद्योग, पर्यावरण आदी बाबींचा विचार  या आराखड्यामध्ये करण्यात आला आहे. महापालिकेत (Pune Corporation) समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांबाबत पुण्यातील लोकप्रतिनिधीना यामध्ये काही सूचना करायच्या असतील तर त्या कराव्यात. शहर हिताचा विचार करताना त्यामध्ये कुठलेही राजकारण असू नये हीच आमची भुमिका आहे, असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे मेट्रोच्या (Pune Metro) वनाज ते आयडियल कॉलनी मेट्रोचा ट्रायल रन आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. पवार म्हणाले पीएमारडीए हे राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसरे सर्वात मोठे नगर विकास प्राधिकरण झाले आहे. भविष्यातील पुढील 50 वर्षांचा विचार करून आराखडा तयार केला आहे. विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यामध्ये राजकारण न करता तो गतीने कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणे हे महाविकास आघाडीचे धोरण आहे.

लोकशाही मध्ये सर्वाना मत मांडायचा अधिकार आहे. 23 गावांसह साडेसहा हजार की.मी. क्षेत्रफळाचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये 10 मेट्रो मार्ग, 2 रिंगरोड, 11 बिझिनेस हब, शैक्षणिक संस्था, क्रीडा विद्यापीठ, संशोधन संस्था, क्रीडा संकुल अशा अनेकविध बाबींचा त्यामध्ये विचार करण्यात आला आहे. पुण्यातील लोकप्रतिनिधींनीची याबाबत काही सूचना असतील यात काही गैर नाही. महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांनीही काल बैठकीत त्यांचे मुद्दे मांडले.  खासदार गिरीश बापट व अन्यही लोकप्रतिनिधींच्या काही सूचना असतील त्यांनी त्या सूचना मांडाव्यात. आराखडा अंतिम करताना त्या सूचनांचा निश्चितच विचार केला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या मागणीला कात्रजचा घाट !

नुकतेच 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. महानगरपालिका कायद्यानुसार या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे.
पीएमआरडी ने 23 गावांचा आराखडा तयार केला आहे तो महापालिकेला द्यावा.
महापालिका त्यावरील पुढील कार्यवाही पार पाडेल, अशी भुमिका महापालिकेतील सत्ताधारी भाजप ने मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील सापष्टीकरण देऊन भाजपच्या मागणीला कात्रज चा घाट दाखवल्याचे बोलले जात आहे.

Web Tital : Pune Corporation | People’s representatives should make suggestions on development plans of 23 villages – Deputy Chief Minister Ajit Pawar

IT Company | दिग्गज IT कंपनी देईल 1 लाख लोकांना नोकरी, उत्पन्नात झाली 41.8 टक्केची वाढ

Pune Crime | रेल्वे प्रवाशांच्या वस्तू चोरणार्‍यास सक्तमजुरीची शिक्षा; चोरीच्या 11 गुन्ह्यात झाला कारावास

Rajesh Tope | राज्यातील ‘हे’ 11 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यातील निर्बंध उठणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Related Posts