IMPIMP

Pune : शरद पवार, CM उध्दव ठाकरे, अजित पवारांचे फोटो मॉर्फ करून समाजमाध्यमांवर बदनामी; पुण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune: Defamation on social media by morphing photos of Sharad Pawar, CM Uddhav Thackeray, Ajit Pawar; 13 charged in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – सोशल मीडियावर काहीजणांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा (crime) दाखल केला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार; कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास HC चा नकार

याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नावे आहेत. याबाबत आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भादवी कलम 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे crime दाखल करण्यात आले आहेत.

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून या आरोपींनी बदनामी केली आहे. फेसबुक, Whatsapp, ट्विटरवर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणण्यासाठी त्यांचे फोटो मॉर्फ करून तसेच घाणेरड्या व अश्लील पोस्ट प्रसारित केल्या होत्या. तसेच सोशल मीडियावरील विविध ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण व ब्राह्मणेतर जातीत तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट केल्या आहेत.

Nawab Malik on Maratha Reservation : ‘आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचे पाठबळ’

फेसबुकवरील काही ग्रुप, व्हाट्सअपवरील ‘Intelectual Forum’ ग्रुप व ट्विटरवर आरोपींनी बदनामीकारक मजकूर प्रसारित केला होता. याबाबत आकाश शिंदे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास करत या 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करत आहेत.

Also Read :

‘महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा, अन्यथा देशातील कोरोना कंट्रोलमध्ये येणार नाही’

भाजपकडून माजी खा. संजय काकडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?, शिवसेनेचा ‘सामना’तुन सवाल

Related Posts