IMPIMP

Pune : हडपसरचे आमदार चेतन तुपे राष्ट्रवादीचे शहराध्यपद सोडणार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना लिहिलं पत्र

by Team Deccan Express
Pune: Hadapsar MLA Chetan Tupe to step down as NCP pune city president , letter to state president Jayant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार व पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे Chetan Tupe यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहिलं असून शहराध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे हे पद देण्यात यावे अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. पक्षाने तुपे यांची विनंती मान्य केल्यास चेतन तुपे यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

पडळकर-खोत म्हणतात – ‘सांगलीचे पालकमंत्री निष्क्रीय तर शासन…’

चेतन तुपे Chetan Tupe हे मागील अडीच वर्षापासून पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. जयंत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात तुपे यांनी म्हटले की, मतदारसंघात काम करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून शहराध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्षाचा जनाधार व्यापक करण्यासाठी काम केले त्यातून बरंच काही शिकायला मिळाले. अनेक समस्यांची जाण व भान आले. पुढील काळात याचा मला निश्चित उपयोग होईल.

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

हडपसर विधानसभा मतदारसंघात पाच लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. यामध्ये शेतकरी, शेतमजूर, औद्योगिक कामगार, औद्योगिक वसाहती, झोपडपट्ट्या, टाऊनशिप्स अशा विविध घटकांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसंपर्क कायम ठेवण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. स्वहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला या पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती चेतन तुपे Chetan Tupe यांनी पत्राद्वारे जयंत पाटील यांना केली आहे.

Also Read :

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

Related Posts