IMPIMP

Pune Metro | ‘पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’ कोणाच्याही हस्ते होऊ द्या, उद्घाटन PM मोदींच्या हस्तेच होणार’

by bali123
Pune Metro | let trial run pune metro be hands anyone inauguration will be hands prime minister narendra modi

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) नुकतंच काही दिवसापूर्वी उपमुख्यंमत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे मेट्रोच्या ‘ (Pune Metro) ट्रायल रन’चे उद्घाटन केले होते. यावरून राज्यात याचे पडसाद उमटले होते. या उद्घाटनाचा मुद्दा धरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आणि अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. मात्र, आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केलीय आहे. पुणे मेट्रोची (Pune Metro) ‘ट्रायल रन’ (‘Trial run) कोणाच्याही हस्ते होऊ द्या, मात्र, उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्तेच होणार असल्याचे स्पष्ट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यावेळी ते आज पुण्यात बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज (शनिवारी) शिवाजीनगर येथील मेट्रोच्या (Pune Metro) नियोजित स्थानकावर दाखल होऊन महामेट्रोच्या कामाची पाहणी केली.
त्यांनतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘महामेट्रोच्या ‘ट्रायल रन’ (‘Trial run) चे उद्घाटन राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यात काही गैर नाही.
ते पुणे जिल्याचे पालकमंत्री देखील आहेत. या मेट्रोत केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे.
म्हणून मेट्रोचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे अशीच आम्हा सर्वांची इच्छा आहे.
असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महामेट्रोला 2016 साली केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
त्यानंतर 2017 साली त्याची स्थापना झाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या संदर्भात खूप बैठका घेत मेट्रोचा विषय मार्गी लावला आहे.
अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावेळी दिली आहे.

Web Title : Pune Metro | let trial run pune metro be hands anyone inauguration will be hands prime minister narendra modi

हे देखील वाचा :

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार? अजित पवार अन् उध्दव ठाकरे यांच्या चर्चा; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘ग्रीन’ सिग्नल

PMRDA | पीएमआरडीएचा विकास आराखडा जाहीर ! धरणे, कालवे परिसरात 20 टक्के बांधकामास परवानगी

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती 

Related Posts