IMPIMP

Pune NCP | पुण्यात पोलिस भरतीच्या परिक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना राष्ट्रवादीने दिला ‘निवारा’

by nagesh
Pune NCP | NCP gives 'shelter' to candidates for police recruitment exams in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune NCP | पुणे शहरात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी (Police Recruitment Exam) राज्याच्या कानाकोपऱ्यातून सोमवारी रात्री अनेक उमेदवार पुण्यात दाखल झाले होते. पुण्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी आलेल्या उमेदवारांच्या झोपण्याची सोय करण्यात आली होती. पुण्यात येणाऱ्या उमेदवारांना रात्र बस स्थानक, फुटपाथ किंवा रेल्वे स्थानकावर काढावी लागते. त्यांची गैर सोय होऊ नये यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) नगरसेवक युवराज बेलदरे (Corporator Yuvraj Beldare) यांनी त्याची खास सोय केली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे शहरामध्ये पोलीस भरती किंवा लेखी परिक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांची निवास व जेवणाची आबाळ होते.
याची दखल घेत राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज बेलदरे (Pune NCP) यांनी त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.
परिक्षेसाठी आलेल्या गोंदिया, यवतमाळ, पालघर, धुळे, वर्धा, अमरावती, नाशिक भागातील तब्बल 145 उमेदवारांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

नगरसेवक युवराज बेलदरे म्हणाले, गरीब घरातील ज्यांचं घरदार मोलमजुरी चालत अश्या या विद्यार्थ्यांना पुणे शहरात आल्यावर सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी माझ्या तर्फे हा प्रयत्न आहे.
खर तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत होते, परंतु सर्वांची सोय होऊ शकली नाही. शहरात हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी आलेले होते.
अनेक जण जिथे व्यवस्था होईल तिथे राहिले, परंतु ज्यांची व्यवस्था नाही होऊ शकली अश्या विद्यार्थ्यांना फुटपाथ, बस स्टँड वरतीच रात्र काढावी लागली.
राज्य सरकारने (Maharashtra Government) यावरती उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बेलदरे यांनी म्हटले.

Web Title : Pune NCP | NCP gives ‘shelter’ to candidates for police recruitment exams in Pune

हे देखील वाचा :

Pune News | निळूभाऊ फुले, शंकरराव खरात यांच्या नावाने पुरस्कार सुरू करा

Pune Navratri 2021 | पुण्यात नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा आणि मिरवणुकीला परवानगी नाही; पालिका आयुक्तांचे आदेश

HeartBurn | छातीत जळजळीच्या 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कॅन्सर-हार्ट अटॅकचे असू शकतात संकेत, जाणून घ्या

Related Posts