IMPIMP

Pune News । पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

by bali123
Pune News | allowed to start coaching classes in pune mayor murlidhar mohol tweet

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Coaching classes | मागील काही आठवड्यापूर्वी राज्य सरकारच्या नियमानुसार पुण्यातील सर्व आस्थापना रात्री सात पर्यंत सुरु करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुन्हा सर्व दुकाने, आस्थापना दुपारी 4 पर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत देखील हे नियम कायम ठेवण्यात आले आहे. म्हणजे तिसऱ्या टप्प्यातील (Pune Lockdown) नियमावली सुरू ठेवायचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच, पुण्यात कोचिंग क्लासेस (Coaching classes) देखील सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. Pune News | allowed to start coaching classes in pune mayor murlidhar mohol tweet

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, ‘कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका हद्दीतील कोचिंग क्लासेस (Coaching classes) सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत शर्थींसह परवानगी असणार असल्याची माहिती महापौर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली आहे.

दरम्यान, शुक्रवारी (2 जून) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळी निर्बंधाबाबत पवार म्हणाले की, मॉल सुरू करावे का असा विचार होता. पण सेंट्रल एसीमुळे अधिकारी मॉल सुरु करण्यास नकार देत आहे. दुसऱ्या लाटेत लागलेल्या ऑक्सिजन पेक्षा तिप्पट ऑक्सिजन तयार करायची क्षमता तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये क्लासेस सुरू करणार पण विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्या दोन्ही लसीकरण केलेलं पाहिजे, असं बैठकीदरम्यान अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Web Title : Pune News | allowed to start coaching classes in pune mayor murlidhar mohol tweet

Related Posts