IMPIMP

Pune News | चंद्रकांत पाटील यांच्या नावावर जमीन बळकावण्याचा प्रयत्न; वनखात्यामुळे प्रकरण उघडकीस, जागेची किंमत 200 कोटी

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil comment on strategy of home minister amit shah for bjp victory in assam

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश करून हडपसर (hadapsar) येथील वनविभागाची (forest department) तब्बल 18 एकर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न वन खात्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सातबाऱ्यावर संबंधीत व्यक्तीचे नावही लागले होते. दरम्यान, खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने खडक पोलिसांकडे (Khadak Police) तक्रार केली आहे. संबंधित जागेची बाजारभावानुसार किंमत दोनशे कोटी रुपये इतकी आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अर्जदार पोपट पांडुरंग शीतकल यांनी हडपसर येथील सर्व्हे क्रमांक ६२ येथील सात हेक्‍टर ६८ आर (१८ एकर) इतके वनक्षेत्र वतन म्हणून देण्यात आले होते, असा दावा केला होता. संबंधित जमीन कायमस्वरूपी आपल्या नावावर करून देण्याची मागणी त्यांनी महसुल यंत्रणांकडे केली होती. याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने या मागणीवर विचार करून निर्णय द्यावा, असा आदेश राज्य सरकारला दिला होता. शीतकल यांची मागणी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनीही फेटाळली होती. तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शीतकल यांनी हा दावा केला होता. २०१८ मध्ये शीतकल यांचा दावा पाटील यांनी फेटाळून लावला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मात्र, शीतकल यांनी ही जमीन आपल्या नावावर करावी, असा आदेश महसुल मंत्र्यांनी दिल्याचा बनावट १६ पानी आदेश हवेली तहसीलदारांकडे सुपूर्द केला. संबंधित आदेश खरा वाटल्याने या आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया करून सातबाराही करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण वनविभागाकडे आल्यानंतर उपवनसंरक्षक राहूल पाटील (Rahul Patil) यांनी प्रकरणाची माहिती घेतली. हि जमीन वन विभागाची असून ती हस्तांतर करता येत नाही. असे तहसीलदारांना कळवले. त्यामुळे महसूल विभागाने त्या आदेशाची सत्यता पडताळून पाहिली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी तहसीलदारांनी खडक पोलिसांकडे तक्रार दिली.

दरम्यान, या प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी अर्जदार दोषी दिसत असला तरी जागा बळकावण्याचा डाव कोणाचा आहे हे अद्याप समजू शकले नाही.
त्याचबरोबर बनावट आदेश कसा तयार करण्यात आला याचाही उलगडा झाला नाही.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Khadak Police Station Senior Police Inspector Sheehari Bahirat) म्हणाले की, महसुल विभागाकडून वनखात्याची जमीन निर्वणीकर करण्याचा प्रकार आहे.
महसूल विभागाने तक्रार अर्ज दिला असून चौकशी सुरु आहे अद्याप गुन्हा दाखल केला नाही.

हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते (trupti kolte tahsildar) म्हणाल्या, हवेली तालुक्याचा पदभार घेण्यापूर्वी हा अर्ज करण्यात आला होता.
पदभार घेल्यानंतर हा अर्ज माझ्याकडे आला.
त्यावेळी महसुल मंत्र्यांनी आदेश देऊनही त्यास विलंब का झाला, अशी शंका आली.
संबंधीत व्यक्तींनी आदेशाची खरी नक्कलप्रत दिल्यानंतर त्यांच्या नावे सातबारा झाला.
मात्र वनखात्याकडून यासंबंधी पुर्नविलोकनाचे पत्र आले,
त्यावेळी मंत्रालयात जाऊन कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर फसवणूकीचा प्रकार उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : Pune News | attempt to grab land under the name of chandrakant patil khadak police station

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात ‘घसरण’ तर चांदीच्या दरात ‘तेजी’, जाणुन घ्या

Health Care Tips | तुम्ही सुद्धा आहात घामोळ्यांनी त्रस्त? तर अवलंबा ‘हे’ 2 घरगुती उपाय; जाणून घ्या

Pune News | ‘या’ कंपनीसाठी अदर पुनावाला यांनी मुंढव्यात घेतले 464 कोटींचे 13 फ्लोअर

Related Posts