IMPIMP

Pune News | चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘मी पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही’

by bali123
Pune News | don't write letter your dictatorship chandrakant patil  reply ajit pawar

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) chandrakant patil | साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर (jarandeshwar sugar factory, satara) ईडीने enforcement directorate (ED) कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ज्या कारखान्यावर कारवाई केली आहे तो कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे (Rajendra Ghadge) यांचा आहे. Pune News | don’t write letter your dictatorship chandrakant patil  reply ajit pawar

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या कारवाईवरून भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi government) नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच आता राज्यातील विक्री झालेल्या 54 साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणारे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा यांना लिहिणार आहेत. दरम्यान, पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांना (deputy chief minister ajit pawar) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर देखील दिले आहे. ते पुण्यातील (Pune) पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, अमित शहा यांना राज्यातील 54 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात पत्र लिहणार आहे. कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये कोणीही असो किंबहुना भाजपचे कोण असतील त्यांचीही चौकशी व्हावी. पण पत्रच लिहू नये हि तर तुमची हुकूमशाही आहे असेही ते अजित पवारांना प्रत्युत्तर देताना म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार…

जरंडेश्वर साखर कारखान्या (Jarandeshwar Karkhana) वर करण्यात आलेल्या कारवाईनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यावर अजित पवार यांनीच भाष्य केलं. ते म्हणाले हा कारखाना माझ्या नातेवाईकाचा आहे. सुंदरबाग सोसायटीने ज्या कारखान्यांविरोधात याचिका दाखल केली होती. त्या १४ कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Karkhana) होता. यापूर्वीही सीआयडी चौकशी (CID Inquiry) झाली होती. त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच ज्यांना कोणाला न्याय मागण्यासाठी जिकडे यायचं आहे तिकडे जाणार असून वकिलांचा सल्ला घेत अपिल करतील.

चंद्रकांत पाटलांनी याआधी पण लिहिलं होतं अमित शहांना पत्र…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) व परिवहन मंत्री अनिल परब (transport minister Anil Parab) यांची सीबीआय  (CBI) चौकशीची मागणी केली होती. त्यावरून आघाडी सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते.

Web Title : Pune News | don’t write letter your dictatorship chandrakant patil  reply ajit pawar

Related Posts