IMPIMP

Pune News | काँग्रेसच्या माजी आमदाराची BJP वर टीका, मोहन जोशी म्हणाले – ‘मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश’

by nagesh
Mohan Joshi Pune | 'BJP postpones Cantonment Board elections due to fear of defeat' - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | गेल्या पाच वर्षात शहरातले मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला (BJP) सपशेल अपयश आले असून स्मार्ट सिटी (Smart City) ही तर फसवी योजना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली (Pune News) आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका अशी मोहीम मोहन जोशी यांनी हाती घेतली आहे. या बैठकांमध्ये बोलताना भाजपच्या अपयशाचा पाढाच
जोशी यांनी वाचला.केंद्र सरकारमध्ये पर्यावरण खात्याचे मंत्री मिळूनही मुळा मुठा नद्यांच्या सुधारणांची योजना प्रकाश जावडेकर (prakash javadekar) पूर्ण करू शकलेले नाहीत.वाहतूक कोंडी दूर करणे, चोवीस तास पाणी पुरवठा योजना,रेल्वेचे उड्डाणपूल, पालिकेची उत्पन्न वाढ, झोपडपट्टी सुधारणा, नदीपात्रातील रस्ता अशा योजना मार्गी लागू शकलेल्या नाहीत. भाजपच्या राज्य सरकारच्या काळात मेट्रोचे काम तीन वर्ष रेंगाळले, असे मोहन जोशी यांनी सांगितले. भाजपच्या काळात महापालिकेची (Pune Corporation) आर्थिक घडी विस्कटली, त्यातूनच स्थायी समिती अध्यक्ष आणि पालिका आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाले आहेत, असे मतही मोहन जोशी यांनी मांडले.

केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना प्रायोगिक पातळीवरच फसली आहे. या योजनेची प्रशासकीय रचना केंद्राला जमली नाही, योजनेतील पुण्यासह शंभर शहरांमध्ये स्मार्ट सिटीचा फज्जा उडाला आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

Web Title : Pune News | Former Congress MLA criticizes BJP, says Mohan Joshi – ‘BJP fails to implement big projects

हे देखील वाचा :

Shivsena | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोठी घोषणा

Vijay Rupani | … म्हणून विजय रूपाणींना गमवावे लागले मुख्यमंत्रीपद; PM मोदींच्या कार्यक्रमातही होते उपस्थित

Pune Crime | 2 कोटीचं फसवणूक प्रकरण : पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर, दीप पुरोहित आणि रिनल पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल; कार्यालयात बोलावून मारहाण करुन केला पाय फ्रॅक्चर

Related Posts