IMPIMP

Pune News | महिला डॉक्टरच्या बेडरुम-बाथरुमध्ये छुपे कॅमेरे, आरोपींना जामीन न मिळण्याची दक्षता घ्या, निलम गोऱ्हेंचे पुणे पोलिसांना निर्देश

by bali123
Dr Neelam Gorhe | State Consumer Forum-Deputy Speaker Dr. Neelam Gorhe News

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune News | पुणे शहरातील एका नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये स्पाय कॅमेरा (spy camera) लावल्याची धक्कादायक घटना घडली. हा कॅमेरा बाथरुम आणि बेडरुमध्ये लावण्यात आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा, तसेच आरोपींवर कठोर कारवाई करुन त्याला जामीन (Bail) मिळू नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांना दिले आहेत. Pune News | hidden camera in lady doctors staff quarter bathroom neelam gorhe asks police not to give bail to accuse

पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पस मधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरूम मध्ये कॅमेरा बसवल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.
पुण्यात घडलेल्या धक्कादायक प्रकरणातील आरोपींचा शोध पुणे पोलिसांनी घेऊन तात्काळ अटक करावी. महिलांच्या रुममध्ये असे कॅमेरे बसवण्याची बाब धक्कादायक आहे.
अशाप्रकारे महिलांची होणारी फसवणूक ही गंभीर आहे, असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आरोपीने अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत, याची माहिती मिळवावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले.
पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरला न्याय मिळेल.
असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

आरोपीवर कठोर कारवाई करुन त्याला जामीन मिळणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
अशा अपप्रवृत्तीचा व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही.
याला निश्चितच आळा बसेल, असे त्या म्हणाल्या.
तसेच महिलांनी देखील सजग राहून सावधानता बाळगावी,असे आवाहन निलम गोऱ्हे यांनी केले.

Web Title : Pune News | hidden camera in lady doctors staff quarter bathroom neelam gorhe asks police not to give bail to accuse

Related Posts