IMPIMP

Pune News : सरपंचपदाची निवडणूक झाल्यानंतर नोटांचा पाऊस अन् JCB नं ‘गुलाल-भंडाऱ्या’ची उधळण !

by sikandershaikh
sarpanch-elections-pune-district

खेड (पुणे) : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Pune News | सरपंचपदाची निवडणूक झाल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी क्रेनच्या साहाय्यानं निवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच यांना हार घालत जेसीबीनं गुलाल व भंडाऱ्याची उधळण केली. एका कार्यकर्त्यानं तर कहरच केला. त्यानं चक्क नोटांची बंडलं काढून मिरवणुकीत पैशांचा पाऊस पाडला. पुणे (Pune News) जिल्ह्यातील हा प्रकार आहे. सोशलवर व्हायरल झालेल्या या घटनेचा व्हिडीओ देखील चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

खेड तालुक्याच्या पूर्व भागात असणारं दावडी हे मोठं गाव आहे. 13 सदस्य या ग्रामपंचायतीवर आहेत. सरपंचपद हे सर्वसाधारण आहे. सरपंचपदासाठी संभाजी घारे यांचा एकमेव अर्ज तर उपसरपंच पदासाठी राहुल कदम यांचा एकमेव अर्ज आला. या निवडणुकीच्या सभेत सर्वपक्षीय श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे फक्त 8 सदस्य हजर होते. त्यामुळं संभाजी घारे यांची सरपंचपदी तर राहुल कदम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सिताराम तुरे यांनी काम पाहिलं. त्यांना कामगार तलाठी शेळके भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी इसवे भाऊसाहेब व पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांनी सहकार्य केलं.

Related Posts