IMPIMP

Pune News | नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या संकल्पनेतून धनकवडीत ‘जय हिंद विजय’ शिल्प; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालं लोकार्पण

by bali123
Pune News | 'Jai Hind Vijay' sculpture in Dhankawadi from the concept of corporator Varsha Tapkir; The dedication was held at the hands of BJP state president Chandrakant Patil and in the presence of many dignitaries

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune News) प्रभाग क्र. 39 धनकवडी- आंबेगाव पठारच्या नगरसेविका वर्षा तापकीर (Corporator Varsha Tapkir) यांच्या संकल्पनेतून स्व. शिवाजीराव आहेर पाटील चौकामध्ये ‘जय हिंद विजय’ शिल्प (Jai Hind Vijay) साकारण्यात आले आहे. हे शिल्प स्व. उत्तमरावजी भिंताडे फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. पुण्यात (Pune News) साकारण्यात आलेल्या या शिल्पाचे लोकार्पण भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

‘जय हिंद विजय’ शिल्पाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये धनकवडी-आंबेगाव पठार (Dhankawadi-Ambegaon Pathar) परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय 15 ऑगस्ट 2021 रोजी आफ्रिका खंडातील किलिमांजरो (Kilimanjaro) हे सर्वोच्च शिखर सर करुन भारताचा 75 फुटी झेंडा फडकावून विश्वविक्रम करणाऱ्या धनकवडीची सुकन्या स्मिता घुगे (Smita Ghuge) हिचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यावेळी खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमराव आण्णा तापकीर (MLA Bhimrao Anna Tapkir), सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar), भाजप पुणे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे, अरुण राजवाडे, युवा नेते गणेश भिंताडे, माजी नगरसेविका मोहिनी देवकर, खडकवासला विधानसभा, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक, अभिषेक तापकीर, महेश भोसले, आप्पासाहेब धावणे, सत्यवान कामथे, देवीदास मोरे, राजु डांगी, माऊली पांचाळ, रणधीर गायकवाड, सागर साबळे, शिरीष देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अरविंद साठे, वामनराव साखरे, सुधीर ओक, रामकृष्ण चिंचकर, बाळासाहेब बोत्रे, किरण जोशी, उमेश खंडेलवाल, विजय क्षीरसागर, तुषार आहेर, सचिन धुमाळ, गणेश दिघे, विशाल पोमण, प्रसाद शेडे, अरविंद पोमण, विक्रांत तापकीर, शिशिर दहीतुले, उमेश भोसले, सागर भोसले, केतन यादव, श्रेयस फुगे, स्वप्निल क्षीरसागर, रोहन जाधव, अमेय शिंदे, तेजस कुलकर्णी, कानिफनाथ शिंदे, मयुर दातीर, करण शहा, अक्षय गायकवाड, यश कदम, आविष्कार राजहंस, हर्षप्रित सणस तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व धनकवडी भागातील सर्व संघटना व गणेश मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title : Pune News | ‘Jai Hind Vijay’ sculpture in Dhankawadi from the concept of corporator Varsha Tapkir; The dedication was held at the hands of BJP state president Chandrakant Patil and in the presence of many dignitaries

हे देखील वाचा :

Related Posts