IMPIMP

Pune News | पुण्यातील शिवसैनिक आक्रमक; भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या

by nagesh
Pune News | shivsena workers bring chicken hen in pune bjp office

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे (Offensive statement) राज्यात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. यावरून पुण्यात (Pune News) शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी भाजप (BJP) कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली. यावरून आणखी राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे.

पुण्यातील (Pune) गुडलक चौकातील आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी दगडफेक करण्यात आलीय. आंदोलन सुरु होतं.
अचानक शिवसैनिकांनी मॉलवर दगडफेक करण्यास सुरवात केली.
दरम्यान, मुंबईतील (Mumbai) दादर टीटी परिसरात शिवसेनेचे (Shiv Sena) स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनरवर लावला होता.
त्यावर “कोंबडी चोर !!!” असे नारायण राणेंना झोंबणारे शब्द देखील लिहिले आहेत.
परंतु, पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर हा बॅनर तातडीने हटवण्यात आला होता.
नारायण राणेंच्या वक्तव्याचे पडसाद नाशिकमध्ये देखील पाहायला मिळाले आहेत.
शिवसैनिकांनी नाशिकमध्ये भाजपचे (BJP) कार्यालय फोडले आहे.
भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले आहे.

दरम्यान, नाशिकमधील (Nashik) भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात दगड फेक केली आहे.
दरम्यान त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याला कोरोनाच्या काळात सावरले आहे.
त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल.
ही तर सुरुवात आहे, असा इशारा देखील शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नेमकं काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) हे रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले.
त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला.
मात्र, त्यावेळी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली.
यावरून नारायण राणेंनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती.
अशा शब्दांत जोरदार हल्लाबोल नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) मुख्यमंत्र्यांवर केला होता.

या दरम्यान, या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे.
नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती.
नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

Web Title : Pune News | shivsena workers bring chicken hen in pune bjp office

हे देखील वाचा :

आता WhatsApp द्वारे बुक करू शकता कोविड व्हॅक्सीनेशनचा स्लॉट, जाणून घ्या सोपी पद्धत

Modi Government | देशाची 60 ‘खरब’ची (Trillion) मालमत्ता विकणार मोदी सरकार; प्लान समोर ठेवून सितारमन म्हणाल्या – ‘मालक सरकारच असणार’

Gold ETF | गोल्ड ईटीएफमधून पैसे काढून येथून नफा कमावण्यात गुंतले इन्व्हेस्टर्स, कुठे करत आहेत गुंतवणूक, जाणून घ्या

Related Posts