IMPIMP

Pune Police | आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आई नीलम राणेंविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

by nagesh
Nitesh Rane | life of gauri bhide shud be protected so maharashtra state gov shud give police protection to her right away nitesh rane

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी आणि मुलगा आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी (pune police issues look out notice) केली आहे. निलम राणे (Nilam Rane) आणि नितेश राणे यांना डीएचएफएल कर्ज प्रकरणात (DHFL loan case) पुणे पोलिसांनी (Pune Police) लूक आउट नोटी जारी केली आहे. कंपन्यांकडून घेतलेलं 65 कोटी रुपयांच कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ही नोटीस पाठवली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि. (Artline Properties Pvt. Ltd.) या कंपनीने 25 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि. च्या सह अर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

याशिवाय नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड (Neelam Hotels Pvt) या कंपनीने डीएचएफएल कडून 40 कोटीचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड न झाल्याने डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केली आहे. 3 सप्टेंबर रोजी ही लुकआऊट नोटीस पाठवली आहे.

Web Titel :- Pune Police | pune police issues look out notice against neelam rane mla nitesh rane

हे देखील वाचा :

Pune Rape Case | पुणे स्टेशन परिसरात आईजवळ झोपलेल्या 6 वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करुन बलात्कार

Pune BJP | घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले ! महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’; शहर भाजपच्या महिला अध्यक्षा अर्चना पाटील यांची माहिती

Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मुंबईच्या जेलमध्ये मृत्यू

Related Posts