IMPIMP

राम मंदिर निधी संकलनावरून काँग्रेसकडून टीका, तर दुसरीकडे काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याने दिले 2 लाख

by pranjalishirish
punjab-cm-amarinder-singh-donated-two-lakhs-construction-Ayodhya-ram-mandir

लुधियाना : वृत्तसंस्था – अयोध्या Ayodhya येथे भव्य राम मंदिर उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, देशभरातून निधी संकलित करण्याची मोहीम सुरू केली जात आहे. त्यातच याच निधी संकलनावरून महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र, आता काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाखांची देणगी दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अयोध्या Ayodhya  येथे राम मंदिर उभारणीसाठी दोन लाखांची देणगी दिली आहे. रविवारी पंजाबमध्ये राम मंदिर उभारणी मोहिमेचा समारोप झाला. त्यावेळी कॅप्टन सिंग यांनी देणगी दिली. या देणगीनंतर प्रांत संयोजक राम गोपाल यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राम मंदिरासाठी पंजाबमधून आत्तापर्यंत 41 कोटी रुपयांची देणगी जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. राम गोपाळ यांनी सांगितले, की पंजाबमधील नागरिकांनी राम मंदिरासाठी स्वखुशीने देणग्या दिल्या आहेत. देणगीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, पंजाबमधून किती देणगी जमा झाली याची निश्चित माहिती मिळाली नाही.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अयोध्या Ayodhya राम मंदिराच्या निधी संकलनावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. राम मंदिराच्या नावाखाली टोलवसुली सुरू आहे. भगवान श्रीरामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका फक्त भाजपला दिलाय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Also Read :

शिवसेना-राष्ट्रवादी’च्या भूमिकेवर नाना पटोले भडकले !

औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मिळाला ‘हा’ मोठा सन्मान, ‘आशिया पोस्ट फेम इंडिया’ कडून दखल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts