IMPIMP

Rahul Gandhi | राहुल गांधींचा RSS वर निशाणा; म्हणाले – ‘महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?’

by nagesh
Rahul Gandhi | congress leader rahul gandhi ask mahatma gandhi seen women around him why mohan bhagwat not

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आणि संघ महिलांना पुढे येऊ देत नाही, असा घणाघाती आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. याच वेळी त्यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या फोटोमध्ये साधारणपणे 2-3 महिला दिसतात. पण मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या फोटोत महिला का दिसत नाहीत ? असा सवाल त्यांनी केला आहे. महिला काँग्रेस स्थापना दिन कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राहुल गांधी म्हणाले, मोहन भागवत यांची संघटना आरएसएस महिला शक्तीला (Women’s power) दाबण्याचे काम करते.
तर काँग्रेस संघटना महिलांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. ते पुढे म्हणाले, आरएसएसने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पंतप्रधान (Prime Minister) केले नाही. मात्र काँग्रेसने एका महिलेला देशाचे पंतप्रधान केले. भाजप सरकारने (BJP government) लक्ष्मी आणि शक्तीला घरातून बाहेर काढले आहे. सरकारने असे धोरण लागू केले आहे की, आज लोकांकडे पैसे नाहीत. नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी कायदे, यांसारखी समाजविरोधी धोरणे राबवून, या सरकारने लक्ष्मीची संपूर्ण शक्ती आपल्या चार-पाच लोकांच्या हातात सोपवली आहे.

महिला काँग्रेस स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, जेव्हा आपण महात्मा गांधींचा फोटो पोहतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या आजूबाजूला दोन ते तीन महिला दिसतात.
याउलट आपण कधी मोहन भागवत यांचा एखाद्या महिलेसोबत फोटो पाहिला आहे ? कारण त्यांची संघटना महिलांना दडपण्याचे काम करते आणि आमचा पक्ष त्यांना व्यासपीठ देते.

Web Title : Rahul Gandhi | congress leader rahul gandhi ask mahatma gandhi seen women around him why mohan bhagwat not

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,364 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Court | शिवाजीराव भोसले सह. बँकेचं 496 कोटीचं अपहार प्रकरण ! आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह ‘या’ 7 जणांविरूध्द कोर्टात 7380 पानी पुरवणी दोषारोप पत्र

Dizo Smartwatch | ‘डीझो’ने भारतात लाँच केल्या 2 बेस्ट स्मार्टवॉच; काय आहे किंमत? जाणून घ्या

Related Posts